Agriculture News in Marathi Convenience cases Somaiya covers: Shetty | Agrowon

सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून ठेवतात ः शेट्टी  

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री संशयास्पदपणे झालेली आहे. यात भाजपसहित सर्वच पक्ष गुंतलेले आहेत. मात्र किरीट सोमय्या फक्त ‘जरंडेश्‍वर’ कारखान्याबाबत आरोप करीत आहेत.

पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री संशयास्पदपणे झालेली आहे. यात भाजपसहित सर्वच पक्ष गुंतलेले आहेत. मात्र किरीट सोमय्या फक्त ‘जरंडेश्‍वर’ कारखान्याबाबत आरोप करीत आहेत. सोयीच्या माणसांचे झाकून ठेवायचे आणि गैरसोयीच्या लोकांची प्रकरणे बाहेर काढण्याची त्यांची भूमिका चुकीची आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. सगळ्याचं काढा. त्याला आमचा पाठिंबा आहे. मुळात, सोमय्या ज्या कारखान्यांबाबत आरोप करीत आहेत ते पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे होणार आहेत का? या प्रकरणात मी सोमय्यांपेक्षाही दोन पावले पुढे आहे. कारण सहा वर्षांपूर्वी मी साखर कारखाने विक्रीचा घोटाळा समोर आणला होता. तेच मुद्दे घेऊन आज सोमय्या बोलत आहेत. त्यात नवे काहीच नाही. मी आरोप करीत असताना ‘ईडी’ने दखल का घेतली नाही, ‘ईडी’ त्या वेळी खुळी होती काय, असा माझा सवाल आहे.’’ 

कारखान्यांच्या विक्री प्रकरणात एकमेव ‘जरंडेश्‍वर’ नाही, असे स्पष्ट करीत शेट्टी म्हणाले, ‘‘माझ्याकडे या कारखान्यांची यादी आहे. ती प्रसारमाध्यमांना देण्यास मी तयार आहे. मी मात्र कोणालाही पाठीशी घालणार नाही. सगळेच चोर आहेत आणि चोरांना शासन झालेच पाहिजे. थेऊरचा साखर कारखाना चालविण्यासाठी भागभांडवल देण्यास सभासद शेतकरी पुढे आले होते. आम्ही दहा वेळा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात गेलो. पण त्यांनी शेतकऱ्यांचे ऐकले नाही. आताही सरकार बदलले, पण शेतकऱ्यांना लुटण्याची वृत्ती बदलली नाही.’’ 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...