Agriculture news in marathi The convocation ceremony of 'Pandekrivi' was finally postponed | Page 3 ||| Agrowon

‘पंदेकृवि’चा दीक्षान्त समारंभ अखेर पुढे ढकलला 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शुक्रवारी (ता. ३०) नियोजित असलेला ३५ वा दीक्षान्त समारंभ विद्यार्थी, कार्यकारी परिषद सदस्यांच्या विरोधानंतर तूर्त पुढे ढकलण्यात आला आहे.

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शुक्रवारी (ता. ३०) नियोजित असलेला ३५ वा दीक्षान्त समारंभ विद्यार्थी, कार्यकारी परिषद सदस्यांच्या विरोधानंतर तूर्त पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी (ता. २२) सायंकाळी उशिरा विद्यापीठ प्रशासनाने घोषणा केली. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती तसेच राज्याचे कृषिमंत्री तथा प्रतिकुलपती यांच्या पूर्वपरवानगीने आयोजित करण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या काळात तसेच फीच्या कारणाने विद्यार्थी संघटनांनी या समारंभाला कडाडून विरोध सुरू केला होता. 

विद्यार्थ्यांची मागणी पाहता काही कार्यकारी परिषद सदस्यांनीही नियोजनाच्या बैठकीत हा समारंभ लोकभावना पाहता घेऊ नये, अशी भूमिका घेतली. तरीही विद्यापीठातील काही वरिष्ठ या मागण्यांवर गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत विरोध अधिक तीव्र होऊ लागला होता. त्यानंतर प्रशासनाने एक पाऊल मागे येत गुरुवारी विद्यापीठ विद्या परिषद व नंतर कार्यकारी परिषद सदस्यांची बैठक घेत त्यामध्ये यावर चर्चा केली. सदस्यांनी समारंभाला सध्याची परिस्थिती योग्य नसल्याचे सांगितले. शिवाय कोविड १९चा प्रादुर्भाव व शासनाकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जाहीर केलेल्या सूचनांनुसार व वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने दीक्षान्त समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दीक्षान्त समारंभ हा पदविधारकांच्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण असतो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा समारंभ होणे योग्य नाही, ही विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याने बैठकीत आपणही या बाजूनेच मत मांडले. परिस्थिती सुधारल्यानंतर समारंभ घेता येईल, असे सुचविले. 
- गणेश कंडारकर, कार्यकारी परिषद सदस्य, पंदेकृवि, अकोला 


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...