agriculture news in Marathi Cooperation with government for restrict CORONA Maharashtra | Agrowon

कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे : कृषिमंत्री

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत प्रशासनास सहकार्य करावे

मालेगाव, जि. नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे केले.

मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत शुक्रवार (ता. २०) दुपारी महसूल, पोलिस, महानगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या वेळी महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, साहाय्यक उपायुक्त राहुल मर्ढेकर आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे यांनी म्हणाले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. नागरिकांनी शहरात गर्दी करू नये. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती तत्काळ प्रशासनास द्यावी. रविवारी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

उपविभागीय अधिकारी डॉ. शर्मा यांनी म्हणाले, की जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशान्वये शहरातील गर्दी होणारे हॉटेल, लॉन्स, मंगल कार्यालये, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी चहाची हॉटेल, चित्रपटगृहे आदी सर्व ठिकाणे बंद करण्यात येणार आहेत. वरील ठिकाणी निरीक्षणासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात पाच ते सहा जणांचा समावेश असेल.

मालेगाव शहरातील सर्व पान दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुरू असलेले सेतू केंद्रही बंद करण्यात आले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...