Agriculture news in Marathi Cooperation for Turmeric Cultivation: Vice Chancellor Dr. Sanjay Sawant | Agrowon

हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ. संजय सावंत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कोकणातील हवामान हळद लागवडीकरिता अनुकूल असून, शेतकऱ्यांनी हळद लागवडीकरिता पुढाकार घेतल्यास दापोली कोकण कृषी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी दिली.

दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद लागवडीकरिता अनुकूल असून, शेतकऱ्यांनी हळद लागवडीकरिता पुढाकार घेतल्यास दापोली कोकण कृषी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी दिली.

देगाव-करंजाळी या दोन गावांतील शेतकरी हळद लागवडीसाठी प्रयत्नशील असून, प्रगतशील शेतकरी अश्‍विन मोरे यांचे पुढाकाराने या दोन गावांतील शेतकऱ्यांनी हळद लागवडीची तयारी दर्शवली आहे.

दोन्ही गावच्या सरपंचांची कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या सोबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर तसेच शास्त्रज्ञ उपस्थित होते. कोकणातील पाचही जिल्ह्यातील जमिनीचा प्रकार वेगवेगळा असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या जातीची लागवड करायची यासंदर्भात कृषी विद्यापीठाने संपूर्ण डाटा गोळा केला असून पुढील काळात हळद लागवडीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी कृषी विद्यापीठ सज्ज झाले आहे.

कोकणातील लाल मातीमध्ये हळदीच्या कोणकोणत्या जाती चांगल्या पद्धतीने होऊ शकतात याबद्दल शास्त्रज्ञांनी या बैठकीमध्ये आपापली मते मांडली. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सेलम या जातीची लागवड केली जाते. मात्र, या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जास्त आहे. परंतु या जातीचे उत्पन्न मात्र चांगले मिळत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सेलम ही जात मोठ्या प्रमाणात लावली जात आहे. परंतु कोकणातला विचार केला तर कोकणामध्ये प्रगती, प्रतिभा, सोनिया, मेघा, वाई अशा विविध जातीची लागवड केली जात आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी प्रगती या हळदीच्या जातीचा अभ्यास केला असता ही जात कोकणातील हवामान व मातीला चांगली सुटेबल असल्याचे दिसून आले आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर तसेच इतर शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख यांनी शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केले. तसेच लागवड कोणत्या महिन्यात करायची, उत्पन्न कशा पद्धतीने घ्यायचे, माती परीक्षण करून त्या वाणाची निवड करू, अशी माहिती दिली.

अलीकडच्या काळात कोकणातील शेतकरी विद्यापीठाकडे संपर्क साधत असून आपल्या कारकिर्दीत करंजाळी व देगाव या दोन गावांतील शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आम्हाला हळद लागवड करायची आहे, विद्यापीठाचे सहकार्य मिळावे अशी भावना व्यक्त केल्याने शेतकरी वर्गात आता जागृकता दिसून येत आहे.
- डॉ. संजय सावंत, कुलगुरू


इतर ताज्या घडामोडी
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने ६३८५ क्‍...औरंगाबाद : ‘‘किमान आधारभूत किमतीने ६३८५ क्‍...
परतूर तालुक्‍यातील द्राक्ष, डाळिंब...जालना  : परतूर तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्ष...
खानदेशात गहू पेरणीचा वेग मंदावलाजळगाव : खानदेशात गेली आठ ते १० दिवस ढगाळ वातावरण...