agriculture news in marathi co_operative development federation work with farmers to sell vegetables | Agrowon

गृहनिर्माण संस्थांमध्ये घरपोच धान्य, भाजीपाला; सहकार विकास महामंडळाचा उपक्रम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

सहकार विकास महामंडळाने गृहनिर्माण संस्थांमध्ये थेट धान्य, भाजीपाला आणि फळे पुरवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संस्थांमधील सदस्यांनी मागणी नोंदविल्यास धान्य आणि किराणा दोन दिवसांत तर, ताजा भाजीपाला दुसऱ्या दिवशी घरपोच मिळणार आहे.

पुणे : कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस अधिक भयावह होत असताना, नागरिकांची किराणा माल आणि भाजीपाल्याची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या सहकार विकास महामंडळाने गृहनिर्माण संस्थांमध्ये थेट धान्य, भाजीपाला आणि फळे पुरवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संस्थांमधील सदस्यांनी मागणी नोंदविल्यास धान्य आणि किराणा दोन दिवसांत तर, ताजा भाजीपाला दुसऱ्या दिवशी घरपोच मिळणार आहे.

"घराबाहेर पडून नका येऊ कोरोनाच्या सांनिध्यात, आम्ही पोचवू शेतमाल आपल्या दारात'' हे ब्रीदवाक्‍य घेऊन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ प्रत्येक सोसायटीत पोचणार आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार विशेष कार्याधिकारी संतोष पाटील, राज्य सहकार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येणार आहे. सोसायट्यांमधील सभासद आणि शेतकरी, शेतमाल उत्पादक कंपन्यांमध्ये महामंडळ समन्वयाची भूमिका बजावणार आहे. एखाद्या सभासदाने संकेतस्थळावर जाऊन धान्य किंवा भाजीपाल्याची मागणी नोंदविल्यास त्यानुसार महामंडळाचे अधिकारी संबंधित शेतकरी आणि कंपनीसोबत संपर्क साधतील. त्यानुसार सोसायट्यांना घरपोच पुरवठा करण्यात येईल.

संकेतस्थळावर अर्जात भरावयाची माहिती ः
गृहनिर्माण संस्थेचे नाव, पत्ता, सदस्याचे नाव, मोबाईल क्रमांक व शेतमालाचा तपशील : गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, पीठ, डाळी, किराणामाल, तेल, मसाले, सुकामेवा, लोणचे, पापड, भाजीपाला, फळभाज्या, फळे, बेकरी पदार्थ, अंडी, दुग्धजन्य पदार्थ याची मागणी नोंदविता येईल.

अशी नोंदवा मागणी... 

  • महाराष्ट्र राज्य सहकार महामंडळाच्या www.mahamcdc.com या संकेतस्थळावर जाऊन धान्य, किराणामाल, पालेभाज्या आणि फळांची मागणी नोंदविता येईल.
  • गृहनिर्माण संस्थेमधील प्रत्येक सदस्याला मागणी नोंदवता येईल. यामध्ये समन्वयक म्हणून संस्थेचे अध्यक्ष, सचिव काम पाहतील.
  • प्रत्येक संस्थेला विशिष्ट सांकेतांक क्रमांक देणार आहे. त्याचा वापर करून सभासद मागणी नोंदवू शकतील

नोंदणीसाठी येथे साधा संपर्क...
९४०४५१५५३७, ९२२५५६३९८७
८४८३८८१०१८

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोसायट्यांमधील सभासदांना रास्त दरात घरपोच धान्य, भाजीपाला आणि फळे मिळावीत यासाठी सहकार महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. भविष्यात प्रत्येक सोसायटीसाठी बाराही महिने ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
— मिलिंद आकरे, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी महामंडळ


इतर अॅग्रो विशेष
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...