शेतमाल
शेतमाल

शेतमालाचे पैसे २४ तासांत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने द्याः पणन संचालक

पुणे: बाजार समित्यांमधील अडत्यांनी एकापेक्षा अधिक बॅंक खात्यांवरून एक कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा रोखीचा व्यवहार केल्यास त्यास प्राप्तिकर कायद्यातील बदलानुसार दोन टक्के टीडीएस आकारला जाणार आहे. याबाबत बाजार समित्या आणि आडत्यांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाल्यानंतर पणन संचालकांनी शेतमाल खरेदी विक्री व्यवहारातील रक्कम अडत्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे) २४ तासांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचे आदेश जारी केले आहेत.  याबाबत सहकार पणनच्या अनभिज्ञतेबाबतचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केल्यानंतर पणन विभागाने तातडीने परिपत्रक काढून बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत.  प्राप्तिकर कायद्यातील बदलाची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून सर्वच क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. या नवीन कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीचा थेट परिणाम शेतमाल खरेदी विक्री व्यवहारांवर होणार आहे. बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदी विक्रीचे पारंपरिक व्यवहार रोखीने होत आहेत. या व्यवहारांवर बंधने आणण्यासाठी आयकर कायद्यात १ कोटीपेक्षा अधिकच्या रोखीच्या व्यवहारांवर दोन टक्के टीडीएस कपात करण्यात येणार आहे. याबाबत सहकार आणि पणन विभाग अनभिज्ञ होता. परिपत्रकानुसार प्राप्तिकर कायदा १९६१ चे कलम १९४ एन मध्ये झालेल्या बदलानुसार १ सप्टेंबर २०१९ नंतर बॅंकखात्यामधुन १ कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास २ टक्के रक्कम उदम (टीडीएस) कर कपातीस पात्र ठरणार आहे. या बदलाच्या अनुषंगाने बाजार समिती आवारातील आडत्याने शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा इतर माल विक्री करणाऱ्यांच्या शेतमालाच्या रकमा महाराष्ट्र कृषी पणन (विकास व विनियमन) १९६३  व नियम १९६७ चे कलम २० मधील तरतुदीनुसार त्याच दिवशी शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर इलेक्ट्रॉनिक (आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे) पद्धतीने हस्तांतरीत कराव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com