agriculture news in Marathi, cooperative director says, give payment of agriculture produce within 24 hours, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतमालाचे पैसे २४ तासांत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने द्याः पणन संचालक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पुणे: बाजार समित्यांमधील अडत्यांनी एकापेक्षा अधिक बॅंक खात्यांवरून एक कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा रोखीचा व्यवहार केल्यास त्यास प्राप्तिकर कायद्यातील बदलानुसार दोन टक्के टीडीएस आकारला जाणार आहे. याबाबत बाजार समित्या आणि आडत्यांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाल्यानंतर पणन संचालकांनी शेतमाल खरेदी विक्री व्यवहारातील रक्कम अडत्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे) २४ तासांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचे आदेश जारी केले आहेत. 

पुणे: बाजार समित्यांमधील अडत्यांनी एकापेक्षा अधिक बॅंक खात्यांवरून एक कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा रोखीचा व्यवहार केल्यास त्यास प्राप्तिकर कायद्यातील बदलानुसार दोन टक्के टीडीएस आकारला जाणार आहे. याबाबत बाजार समित्या आणि आडत्यांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाल्यानंतर पणन संचालकांनी शेतमाल खरेदी विक्री व्यवहारातील रक्कम अडत्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे) २४ तासांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचे आदेश जारी केले आहेत. 

याबाबत सहकार पणनच्या अनभिज्ञतेबाबतचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केल्यानंतर पणन विभागाने तातडीने परिपत्रक काढून बाजार समित्यांना परिपत्रकाद्वारे आदेश दिले आहेत. 

प्राप्तिकर कायद्यातील बदलाची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून सर्वच क्षेत्रात लागू करण्यात आली आहे. या नवीन कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीचा थेट परिणाम शेतमाल खरेदी विक्री व्यवहारांवर होणार आहे. बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदी विक्रीचे पारंपरिक व्यवहार रोखीने होत आहेत. या व्यवहारांवर बंधने आणण्यासाठी आयकर कायद्यात १ कोटीपेक्षा अधिकच्या रोखीच्या व्यवहारांवर दोन टक्के टीडीएस कपात करण्यात येणार आहे. याबाबत सहकार आणि पणन विभाग अनभिज्ञ होता.

परिपत्रकानुसार प्राप्तिकर कायदा १९६१ चे कलम १९४ एन मध्ये झालेल्या बदलानुसार १ सप्टेंबर २०१९ नंतर बॅंकखात्यामधुन १ कोटीपेक्षा अधिक रक्कम काढल्यास २ टक्के रक्कम उदम (टीडीएस) कर कपातीस पात्र ठरणार आहे. या बदलाच्या अनुषंगाने बाजार समिती आवारातील आडत्याने शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा इतर माल विक्री करणाऱ्यांच्या शेतमालाच्या रकमा महाराष्ट्र कृषी पणन (विकास व विनियमन) १९६३  व नियम १९६७ चे कलम २० मधील तरतुदीनुसार त्याच दिवशी शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर इलेक्ट्रॉनिक (आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे) पद्धतीने हस्तांतरीत कराव्यात.

इतर अॅग्रो विशेष
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...