agriculture news in marathi co_operative institutes must come forward for financial assitance : Minister Balasaheb Patil | Agrowon

राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे : सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

सातारा : राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे केले.
 

सातारा : राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी राज्यातील सहकारी संस्थांनी मदतीसाठी पुढे येऊन जास्तीत जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे केले.

राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम म्हणून  जगाची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. देशातही सर्वत्र उत्पादकता थांबली आहे, उद्योग बंद आहेत, लहान व्यवसायांवर गंडांतर आले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध सहकारी संस्था, स्वयंसेवकांनी तसेच दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. 

पतसंस्था, बँका, सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, ऑईल मिल यांच्या माध्यमांतून महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडले आहे. राज्यात ४७५ नागरी बँका, १३ हजार ५५९ नागरी पतसंस्था, सात हजार २५३ कर्मचारी पतसंस्था, २१ हजार ४२५ विकास सोसायटी, ९५ हजार ४६८ सहकारी गृहनिर्माण संस्था, २१५ साखर कारखाने, ६७ सहकारी दूध संघ आहेत. इतक्या संस्थांद्वारे सहकाराचे जाळे राज्यभर पसरले आहे. सहकार कायद्यातही संस्थेच्या नफ्याच्या किती टक्के रक्कम मदत करावी, याची तरतूद आहे. तरी राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मोठ्या प्रमाणात मदत करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...