agriculture news in marathi Cooperative institutions elections postponded till 31st december due to Corona Pandemic | Agrowon

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निवडणुकांना ही चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे असून, ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निवडणुकांना ही चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे असून, ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. याच कारणास्तव पुन्हा निवडणुका ३१ डिसेंबर २०२०पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी (ता.२८) सरकारने घेतला आहे.

ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणुका जानेवारी ते जून या कालावधीत होऊ घातल्या आहेत. अशा संस्थांच्या संचालकांची मुदत संपण्यापूर्वी या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. कोरोना संकटामुळे राज्यातील अशा मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

याबाबतचे आदेश सरकारने जारी केले. मात्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होतील, असेही आदेशात म्हटले आहे.

या संस्थांना मुदतवाढ
मुदतवाढ मिळालेल्या सहकारी संस्थांमध्ये कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासह (गोकूळ), २२ जिल्हा मध्यवर्ती बँका आणि ८ हजार १९४ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचा समावेश आहे. जिल्हा बँकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर आणि मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, औरंगाबादसारख्या महत्त्वाच्या जिल्हा बँका आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...