जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
सहकारी संघाकडूनही गाईच्या दूधदरात कपात
लॉकडाउन झाल्यानंतर दुधाची मागणी कमी झाली होती. मात्र आता गेल्या दोन महिन्यांपासून दुधाला चांगली मागणी वाढलेली असतानाही दूध खरेदीदार संघाकडून दरात कपात केली जात आहे.
नगर ः लॉकडाउन झाल्यानंतर दुधाची मागणी कमी झाली होती. मात्र आता गेल्या दोन महिन्यांपासून दुधाला चांगली मागणी वाढलेली असतानाही दूध खरेदीदार संघाकडून दरात कपात केली जात आहे. मागील महिन्यात खासगी संघांनी गाईच्या दुधाचे दर कमी केल्यानंतर आता सहकारी संघही दुधाचे दर कमी करत आहेत. मागणी वाढूनही दुधाचे दर कमी केले जात असल्याने दूध उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
नगर जिल्ह्यात दर दिवसाला २७ लाख लिटर तर राज्यात गाईंच्या दुधाचे एक कोटी ४० लाखांपर्यंत संकलन केले जात आहे. दहा ते पंधरा लाख लिटर दुधाचे उपपदार्थ केले जातात. ७० ते ८० लाख लिटर दूध पिशव्यातून थेट ग्राहकांना ४५ ते ५० रुपये दराने विकले जात आहे. मात्र अतिरिक्त दुधाच्या नावाखाली खाजगी खरेदीदार दूध संघांकडून सातत्याने दर पाडले जात आहे. सहा महिन्यांनंतर गेल्या महिनाभरात अंदोलनाच्या इशाऱ्यानंतर २५ ते २७ रुपये दुधाला दर मिळत होता.
त्यानंतर एका महिन्यात खासगी खरेदीदार संघाच्या संघटनेने ३.५ फॅट व ८.५ एसएनएफच्या दुधाची २४ रुपयांपेक्षा (वाहतूक व कमिशनसह) खरेदी करू नये असे संकलन केंद्रांना सांगितले. त्यानुसार दुध उत्पादकांना पुन्हा २० ते २१ रुपये प्रति लिटरला दर मिळू लागला.
आता खासगी संघासोबत सहकारी संघांनीही दूधदरात कपात सुरू केली आहे. दूध उत्पादक पुरवठा करत असलेल्या दुधापैकी ६० टक्के दुधाला (३.५ फॅट व ८.५ एसएनएफ) प्रति लिटर २० रुपये व ४० टक्के दुधाला २५ रुपये दर दिला जाणार असल्याचे संगमनेर (जि. नगर) तालुका दूध संघाने जाहीर केले आहे. दूध संकलन केंद्रांना याबाबत पत्र काढले आहे. १ नोव्हेंबरपासून हे दर लागू पडतील असे संघाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने दूध भुकटी रूपांतर योजना कुचकामी ठरत आहे.
ठरवून दूध उत्पादकांची लूट
दहा महिन्यांपूर्वी राज्यात दुधाला ३२ रुपये दर होता. कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने मागणी कमी झाल्याचे सांगत खरेदीदार संघानी थेट १७ ते १८ रुपयांवर दर आणले. आता दोन महिन्यांपासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे. शिवाय आठ महिन्यांच्या तुलनेत दूध भुकटीचे दरही बऱ्यापैकी वाढले आहेत. त्यामुळे काहीसे दर वाढत असतानाच पुन्हा गेल्या महिन्यात दिवाळीच्या तोंडावर राज्यातील सर्वच खासगी दूध खरेदीदार संघाकडून दरकमी केले. त्यामुळे आता पुन्हा २५ रुपयांचा दर पुन्हा २० रुपयांवर आला आहे. खासगी संघाकडून ठरवून दर पाडणे म्हणजे ठरवून दूध उत्पादकांची लूट केली जात असल्याचा दूध उत्पादक शेतकरी आरोप करत आहेत.
प्रतिक्रिया
दुधाला प्रति लिटर ३५ रुपये उत्पादन खर्च शासनानेच जाहीर केलेला असताना केवळ १८ ते २० रुपये दराने दुधाची खरेदी होतेय. तेच दूध संघाकडून ५० रुपये लिटर विकले जातेय. मधील ३० रुपये कुठे जातात याचा सरकारने कधी विचार केला आहे का. मागणी असतानाही दर पाडून दूध व्यवसाय मोडीत काढण्याचा डाव तर नाही ना, असा प्रश्न पडत आहे. सरकारने दूध उत्पादक उद्ध्वस्त होत आहेत. याचा कधी तरी विचार करावा.
— गुलाबराव डेरे, अध्यक्ष, कल्याणकारी दूध उत्पादक संघ, नगर
- 1 of 653
- ››