agriculture news in marathi, co_operative sector must have transparency : Radhamohan | Agrowon

राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हास

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था आहेत. या संस्थांशी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक जोडला आहे. मात्र सहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने अडथळे निर्माण होऊन विकासाचा वेग मंदावला आहे. सहकाराची सेवा पारदर्शी करण्यासाठी संगणकीकरण करण्याबरोबरच कुशल मनुष्यबळाची गरज असून, सरकार यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामाेहन सिंह यांनी येथे केले.

पुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था आहेत. या संस्थांशी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक जोडला आहे. मात्र सहकार क्षेत्राचे राजकीयीकरण झाल्याने अडथळे निर्माण होऊन विकासाचा वेग मंदावला आहे. सहकाराची सेवा पारदर्शी करण्यासाठी संगणकीकरण करण्याबरोबरच कुशल मनुष्यबळाची गरज असून, सरकार यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामाेहन सिंह यांनी येथे केले.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्थेच्या (व्हॅमनीकॉम) वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (ता. १५) मंत्री सिंह बोलत होते. या वेळी रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय समितीचे सतीश मराठे, केंद्रीय कृषी, सहकार आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सचिव वसुधा मिश्र, संयुक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी, व्हॅमनीकॉमचे प्राचार्य अनिल कारंजकर उपस्थित होते. 

मंत्री सिंह म्हणाले, ‘‘सहकार क्षेत्राचे परिणाम ज्या वेगाने दिसायला हवे होते, तेवढ्या वेगात दिसत नाहीत. सहकाराची सेवा अधिक गतिमान होऊन, सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना लाभ मिळण्यासाठी या संस्थांचे संगणकीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. व्हॅमनीकॉमच्या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सहकार अधिक सक्षम करण्याचा संकल्प करू.’’  

मराठे म्हणाले, ‘‘देशात १० हजारपेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या असून, त्यापैकी केवळ ३ हजार कंपन्यांची कामे व्यवस्थित आहेत. याद्वारे केवळ ८ लाख शेतकऱ्यांना फायदा हाेत आहे, मात्र ही संख्या कृषी प्रधान देशामध्ये अत्यल्प आहे. शेतमाल प्रक्रिया उद्योगांच्या अभावामुळे शेतमालाला चांगले दर मिळत नाहीत. देशात केवळ १५ टक्के शेतमालावर प्रक्रिया होत असून, यामध्ये प्रामुख्याने ऊस, कापूस आणि तेलबियांचा समावेश. विविध शेतमालावरील प्रक्रिया उद्योगांचे प्रमाण वाढविण्यासाठी सहकारी तत्त्वावरील शेतीप्रक्रिया उद्याेगांच्या प्रोत्साहनासाठी व्हॅनीकॉमने पुढाकार घेत देशातील विविध संस्थांची समन्वय साधला पाहिजे.’’ 

सहकारी संस्थांनी व्यावसायिकतेत येण्याची गरज असून, शेतकऱ्यांनी शेती ही उद्याेग म्हणून केली पाहिजे, असे मत वसुधा मिश्र यांनी व्यक्त केले.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या...औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद...
शास्त्रीय तंत्राद्वारे वाढवली कांद्याची...अवर्षणग्रस्त येवला तालुक्यातील (जि. नाशिक)...
पडीक जमिनीत फुलवली साडेतीन हजार झाडांची...माहुळंगे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील अनिल...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...