agriculture news in marathi, cooperative sugar factories election process start, nagar, maharashtra | Agrowon

नगरमधील आठ साखर कारखान्यांच्या निवडणुकांची तयारी सुरु

सुर्यकांत नेटके
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

 नगर : विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण शांत होत नाही, तोच आता पुन्हा गाव पातळीवर सहकारातील राजकारणाचा फड रंगणार आहे. जिल्ह्यातील आठ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांच्या निवडणुका होत आहेत. मतदार यादी तयार करण्यासह अन्य बाबींची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्रादेशिक सह संचालक (साखर)कार्यालयातून देण्यात आली. 

 नगर : विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण शांत होत नाही, तोच आता पुन्हा गाव पातळीवर सहकारातील राजकारणाचा फड रंगणार आहे. जिल्ह्यातील आठ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांच्या निवडणुका होत आहेत. मतदार यादी तयार करण्यासह अन्य बाबींची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्रादेशिक सह संचालक (साखर)कार्यालयातून देण्यात आली. 

जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून २३ साखर कारखाने आहेत. देशात सहकाराची पहिली मुहुर्तमेढ नगर जिल्ह्यातूनच रोवली गेली. त्यामुळे जिल्ह्यामधील अनेक नेते राज्याच्या राजकारणात चर्चेत राहणारे असले तरी सहकारातील राजकारणावरही राज्याचे लक्ष असते. विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाची हवा अजून संपलेली नाही. राजकीय पडझडीची गाव पातळीवर अजूनही चवीने चर्चा केली जात आहे. त्यातच आता सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीचे फड रंगणार आहेत. यात मोजके मतदार असले तरी कोणत्या कारखान्यावर कोणाची सत्ता येईल याकडे गाव पातळीवर बारीक लक्ष असते.

साधारण चार महिन्यांत संचालक मंडळांची मुदत संपत असल्याने निवडणुका होत असलेल्या साखर कारखान्यात खासदार डॉ. सुजय विखे अध्यक्ष असलेल्या प्रवरा नगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, माजी खासदार यशवंतराव गडाख व आमदार शंकरराव गडाख यांचे वर्चस्व असलेला सोनईचा मुळा सहकारी साखर कारखाना, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे वर्चस्व असलेला भेंड्याचा लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी सहकारी साखर कारखाना, आमदार मोनिका राजळे यांचे वर्चस्व असलेला पाथर्डीचा वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, श्रीरामपूरचा अशोक सहकारी साखर कारखाना, श्रीगोंद्याचा सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व माजी आमदार राहुल जगताप यांचे वर्चस्व असलेला कर्मयोगी कुंडलीकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. 

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सह संचालक (साखर) कार्यालयाकडून संचालक मंडळाची मुदत संपणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०२० मध्ये निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व निवडणुकीशी संबधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. 
 
निवडणूक होत असलेले साखर कारखाने (संचालक मंडळाची मुदत संपण्याची तारीख) 

 • पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखाना, प्रवरानगर (६ मार्च २०२०) 
 • सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना, संगमनेर (१६ मार्च २०२०) 
 • मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई (२३ मार्च २०२०) 
 • लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडा
  (२७ मार्च २०२०) 
 • वृद्धेश्वर कारखाना, पाथर्डी (२७ मार्च २०२०) 
 • अशोक कारखाना, श्रीरामपूर (२० एप्रिल २०२०) 
 • सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा
  (२० एप्रिल २०२०) 
 • कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा (२१ एप्रिल २०२०) 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...