Agriculture news in Marathi, Coriander in the state is 800 to 3500 rupees | Agrowon

राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये

औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ११) कोथिंबिरीची १३ हजार जुड्यांची आवक झाली. या कोथिंबिरीला ८०० ते ११०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये २७ जूनला १६ हजार ९०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपयांचा दर मिळाला. २ जुलैला २२ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर १०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. ४ जुलैला २५ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ३०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ६ जुलैला कोथिंबिरीची आवक २४ हजार जुड्या, तर दर ५०० ते ९०० रुपये प्रतिशेकडा राहिले. ८ जुलैला १३ हजार ९०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ६०० ते ८०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ९ जुलैला कोथिंबिरीची आवक १० हजार ९०० जुड्या, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १० जुलैला ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला १००० ते १५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल ४६०० ते १७००० रुपये
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १०) कोथिंबिरीची आवक ५२३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल १७००० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ९) कोथिंबिरीची आवक ५०४ क्विंटल झाली. तिला ५६०० ते २३५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सोमवारी (ता. ८) कोथिंबिरीची आवक ४८४ क्विंटल झाली. तिला ४६०० ते १८६०० प्रतिक्विंटल दर मिळाला. रविवार (ता. ७) कोथिंबिरीची आवक ३८५ क्विंटल झाली. तिला १५००० ते २५००० असा दर मिळाला. शनिवारी (ता. ६) कोथिंबिरीची आवक ६५३ क्विंटल झाली. तिला ९६०० ते २०००० असा दर मिळाला. शुक्रवारी (ता. ५) कोथिंबिरीची आवक ६४३ क्विंटल झाली. तिला १४६२३ ते २३५०० असा दर मिळाला. गुरुवारी (ता. ४) कोथिंबिरीची आवक ५४७ क्विंटल झाली. तिला ६६०० ते १८००० असा दर मिळाला. गेल्या आठवड्याभरापासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून आले. मात्र गेल्या ३ दिवसांत कमी झाल्याचे दिसून आले. रविवारी (ता. ७) कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबिरीला २५००० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे.

नागपुरात प्रतिक्‍विंटल २२ हजार रुपये
नागपूर ः मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे कळमणा बाजार समितीत कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या महिन्यात १५ जून रोजी ५००० ते ६००० रुपये क्‍विंटल कोथिंबीर होती. टप्याटप्याने त्यात वाढ होत हे दर आता १८००० ते २२००० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. बाजारात आवक वाढेपर्यंत दरातील तेजी कायम राहणार असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. कोथिंबिरीतील या तेजीमुळे सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर कोथिंबीर गेली आहे. किरकोळ बाजारात १२० ते १५० रुपये  किलो दराने कोथिंबीर विकल्या जात आहे. कळमणा बाजार समिती जून महिन्यात कोथिंबिरीची आवक २२० क्‍विंटलची होती. सद्य:स्थितीत ही आवक ७० ते ९० क्‍विंटल इतकी आहे. बाजारातील ही तेजी जून अखेरपासून अनुभवण्यात आली. २ जुलै रोजी ६००० ते ८००० रुपये, त्यानंतर १०००० ते १५००० रुपये तर आता १८००० ते २२००० रुपये प्रती क्‍विंटलपर्यंत कोथिंबिरीचे दर पोचले आहेत. बाजारात आवक न वाढल्यास कोथिंबिरीचे दरात आणखी वाढीचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.

सांगलीत प्रतिशेकडा ९०० ते १५०० रुपये
सांगली ः येथील शिवाजी मंडईत कोथिंबिरीची आवक वाढू लागली आहे. गुरुवारी (ता. ११) कोथिंबिरीची ९ ते १० हजार पेंड्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिशेकडा ९०० ते १५०० रुपये असा दर मिळाला. मंडईत कोथिंबिरीची सांगली जिल्ह्यातील आष्टा, बोरगाव, मिरज, वाळवा, पलूस या भागातून आवक होते. सध्या पाऊस सुरू असल्याने कोथिंबिरीचे नुकसान होऊ नये म्हणून काढणी लवकर केली जात आहे. बुधवारी (ता. १०) कोथिंबिरीची ५ ते ६ हजार पेड्यांची आवक झाली असून, त्यास प्रतिशेकड्यास ८०० ते १३०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ९) कोथिंबिरीची ६ हजार ते ८ हजार पेंड्यांची आवक झाली होती. कोथिंबिरीस प्रतिशेकड्यास ९०० ते १५०० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. ८) कोथिंबिरीची ९ ते १० हजार पेंड्यांची आवक झाली असून त्यास प्रति शेकड्यास १००० ते १६०० रुपये असा दर मिळाला. रविवारी (ता. ७) कोथिंबिरीची ९ ते १० हजार पेंड्यांची आवक झाली होती. कोथिंबिरीस प्रतिशेकड्यास ९०० ते १५०० रुपये असा दर होता. कोथिंबिरीची आवक कमी अधिक होत असून दर कमी कमी जास्त होत आहेत. पुढील सप्ताहात कोथिंबिरीची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तविला आहे.

नगरला प्रतिशेकडा १००० ते ४००० रुपये
नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ११) कोथिंबिरीची ७५०० जुड्यांची आवक झाली आणि शेकडा १००० कते ४००० रुपये व सरासरी २५०० रुपये दर मिळाला. बाजार समितीत मागणी वाढल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कोथिंबिरीच्या जुडीचे दरही वाढले आहेत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला साधारण चार ते पाच हजार कोंथिंबिरीच्या जुड्यांची आवक होत आहे. मात्र, गेल्या महिनाभरात मागणी वाढल्याने दरातही तेजी आहे. बाजार समितीत ४ जुलैला ६५०० जुड्यांची आवक होऊन शेकडा १५०० ते ५००० रुपये व सरासरी ३२५० रुपये दर मिळाला. २७ जूनला ६५०० जुड्यांची आवक होऊन १५०० ते ६००० रुपये व सरासरी ३२५० चा दर मिळाला. २० जून रोजी ४००० जुड्यांची आवक होऊन १५०० ते ४५०० व सरासरी तीन हजारांचा दर मिळाला. तर १३ जून रोजी ५४०० जुड्यांची आवक होऊन ५०० ते २००० व सरासरी १६०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे.

कोल्हापुरात प्रतिशेकडा १००० ते २५०० रुपये
कोल्हापूर : जिल्ह्यात कोथिंबिरीची दररोज बारा ते पंधरा हजार पेंढ्यांची आवक होत आहे. कोथिंबिरीस शेकडा १००० ते २५०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून कोथिंबिरीच्या दरात वाढ होत असल्याची माहिती भाजीपाल विभागाच्या सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढली आहे. बाजार समितीत प्रामुख्याने पश्‍चिम भागातून कोथिंबिरीची आवक होते. या भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांना कोथिंबिरीची काढणी करण्यास अडथळे येत आहेत. यामुळे आवकेत सातत्य नाही. पावसाने अनेक ठिकाणी कोथिंबीर भिजत आहे. आवक रोडावत असल्याने कोथिंबिरीला चांगले दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. येत्या सप्ताहातपर्यंत तरी कोथिंबिरीचे दर तेजीत राहतील असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.

परभणीत प्रतिक्विंटल ५००० ते १२००० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ११) कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक होती.कोथिंबिरीला प्रतिक्विंटल ५००० ते १२००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये अन्य राज्य तसेच जिल्ह्यातून कोथिंबिरीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी कोथिंबिरीची १५ ते ३५ क्विंटल आवक झाली. ४ जुलैला सरासरी प्रतिक्विंटल ५००० ते २०००० हजार रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ११) कोथिंबिरीची २५ क्विंटल आवक असतांना घाऊक विक्रीचे दर ५००० ते १२००० रुपये प्रतिक्विंटल होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो १६० ते २०० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

गुलटेकडीत शेकडा दीड ते साडेतीन हजार रुपये
पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ११) कोथिंबिरीची सुमारे ६० हजार जुड्यांची आवक झाली होती. या वेळी शेकड्याला सुमारे दीड ते तीन हजार रुपये दर होता. पावसामुळे भिजलेल्या कोथिंबिरीची आवक होत असून, तुलनेने आवक कमी असल्याने दर वाढलेलेच आहेत. गेल्या आठवड्यात घटलेली आवक आणि वाढलेल्या दरामुळे गुजरातमधून कोथिंबिरीच्या आवकेला सुरवात झाली आहे. दररोज सुमारे ७ टेंपोची आवक होत असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर कमी झाल्याचे ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

जळगावात प्रतिक्विंटल ३२०० ते ५८०० रुपये
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिनाभरापासून कोथिंबिरीचे दर स्थिर आहेत. गुरुवारी (ता. ११) तीन क्विंटल आवक झाली. दर किमान ३२०० व कमाल ५८०० रुपये प्रतिक्विंटल एवढा होता. आवक पाचोरा, एरंडोल, यावल, जळगाव या भागांतून होत आहे. आवक कमी अधिक होत असली तरी चार क्विंटलपेक्षा अधिक आवक मागील अनेक दिवसांमध्ये झालेली नाही. किरकोळ बाजारातील दर १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...