नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मक्याचा आधार

पावसाअभावी एकतर मोठ्या प्रमाणात यावर्षी उत्पादनात घट झाली. या वर्षी दुष्काळ असल्याने उन्हाळी मक्याची लागवड नगण्य आहे. मागणी असल्याने बाजार तेजीत आहे. - अरुण पवार, स्वप्निल अग्रो भऊर
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मक्याचा आधार
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मक्याचा आधार

खामखेडा : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र, माघील आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मक्याला २ हजारांचा दर ओलांडून तो २१०० रुपयांवर पोहोचला. वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे. मात्र लाभार्थी शेतकरी कमी असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे.

कळवण व परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माघील आठवड्यात मक्याला विक्रमी २,१५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला, तर दुसरीकडे देवळा तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी देखील २,१५० रुपये दराने मका खरेदी केला. यामुळे दुष्काळात बळीराजाला दिलासा मिळाला. पुढील काही दिवसांत मक्याला आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या आजपर्यंच्या इतिहासात पहिल्यांदाच मक्याला उच्चांकी भाव मिळाला असून, दुष्काळामुळे उत्पादन घटले अन् मालाला भाव आला, अशी परिस्थिती आहे. भाव वाढलेले असताना बाजार समित्यात आवक मात्र पाच ते सहा हजार क्विंटलच्या आतच आहे.

मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने भाव वाढल्याचे देवळा येथील व्यापारी डी के गुंजाळ यांनी सांगितले. एकीकडे कांद्यासाठी केलेला खर्चही कांदा विक्रीतून निघत नाही, तर दुसरीकडे हमीभावापेक्षा ४०० रुपयांहून अधिक दराने मक्याची व्यापाऱ्यांकडून खरेदी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

पावसाअभावी उत्पादनात मोठी घट सध्या देवळा तालुक्यातील भउर परिसरात मक्याने उच्चांक गाठला असून, प्रतिक्विंटल तब्बल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. पावसाअभावी उत्पादनात घट झाली आहे. काही शेतकऱ्यांनी आधीच मका विक्री केली. त्यामुळे आता मक्याची भाववाढ झाल्याने त्याचा मोजक्याच बळीराजाला लाभ होत आहे.

माघील पाच वर्ष्यातील बाजारभाव यापूर्वी सन २०१५ मध्ये ११५० रुपये, २०१६ मध्ये १२५०, २०१७ मध्ये १३००, २०१८ मध्ये १६०० रुपये, तर सध्या २०१९ मध्ये मक्याची खरेदी २१०० रुपये प्रतिक्विंटलने सुरू असल्याने मक्याला ‘अच्छे दिन‘ आल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com