खानदेशात मका दरात वाढ

मका
मका

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्‍याची आवक नगण्य स्वरूपात आहे. दर मागील हंगामाच्या तुलनेत क्विंटलमागे ८०० रुपयांनी अधिक असून, क्षेत्र कमी झाल्याने पुढे आवक कमी राहील, अशी स्थिती आहे. यामुळे बाजारात सुधारणा दिसत आहे. सध्या कुठेही मळणी सुरू नाही. कारण, ऑक्‍टोबरमधील लागवडीचे मका पीक लष्करीमुळे नष्ट झाले. तर डिसेंबरमधील लागवडीचे मका पीक सुस्थितीत असले तरी कणसे पक्व होऊन त्यांची मळणी होण्यास आणखी किमान दीड ते पावणेदोन महिने वेळ लागेल.  जळगाव जिल्ह्यात मका पिकाखालील क्षेत्रात या हंगामात सुमारे ३५ हजार हेक्‍टरने घट झाली आहे. अर्थातच याचा परिणाम पुढे उत्पादनावर चारा उपलब्धतेवर होणार असल्याची माहिती आहे. मका हे जिल्ह्यातील तापी, गिरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रमुख रब्बी पीक बनले आहे. कारण, बऱ्यापैकी पैसा व चारा देणारे पीक म्हणून मका पिकाची ओळख आहे. मागील हंगामत खानदेशात मक्‍याची लागवड सुमारे एक लाख हजार हेक्‍टरवर झाली होती. कापसाखालील क्षेत्र रिकामे करून अनेक शेतकऱ्यांनी मक्‍याची लागवड केली.  मक्‍याचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. तर चाऱ्याला १२०० रुपये प्रतिशेकडा असे दर होते. या हंगामात मक्‍याचे दर १७०० रुपयांपर्यंत आहेत. यातच अमेरिकन लष्करी अळीमुळे मका पिकाचे आतोनात नुकसान चोपडा, जळगाव, रावेर, यावल, पाचोरा व जामनेर भागांत झाले आहे. दोन-तीनदा फवारण्या करूनही लष्करी अळी आटोक्‍यात आली नाही. यामुळे पीक पूर्णतः उद्‌ध्वस्त झाले.  मक्‍याची या हंगामात सुमारे ६० ते ६५ हजार हेक्‍टवर लागवड होईल, असा अंदाज होता. हा अंदाज नोव्हेंबरच्या सुरवातीला खरा ठरतही होता. जळगाव जिल्‍ह्यात फक्त ५३ टक्के, धुळ्यात ३० टक्के तर नंदुरबारातही ४० टक्केच मक्‍याची पेरणी झाल्याचे सांगण्यात आले. खानदेशात मिळून सुमारे २८ हजार हेक्‍टरवर मका लागवड झाल्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com