अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याची चाळण

यंदा लष्करी अळीमुळे सहा एकरांत २० हजार रुपये दोन फवारणीवर खर्च झाले. एवढे करूनही अळीचा प्रादुर्भाव आहेच. आधी लागवड केलेल्या पाच एकरांत २५ ते ३० टक्‍के तर जुलैच्या मध्यात लागवड केलेली एक एकरातील मक्याची अळ्यांनी पार चाळणी करून टाकली. - रामदास जाधव,पाल, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद साडेसात एकर मका पिकात आजवर तीन फवारण्या केल्या. प्रत्येक फवारणीला एकरी १२०० ते २२०० रुपयांपर्यंत खर्च आला. तरीही, २० ते ३० टक्‍के प्रादुर्भाव कायम आहे. पोंग्यात असलेली अळी जर कणसात गेल्यास काय करावे, हा प्रश्‍न आहे. - रावसाहेब शिंदे,नाचनवेल, ता. कन्नड, जि. औरंगाबाद
अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याची चाळण
अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याची चाळण

औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीकडून मका पिकाला पोखरण्याचे काम सुरूच आहे. पोंग्यात असलेली अळी आता कणसात घुसली, तर तिचे नियंत्रण कसे करावे, हा प्रश्‍न मका उत्पादकांना पडला आहे. शिवाय, फवारणीचा खर्च तीन ते पाच हजारांपर्यंत करावा लागला. तरीही अळीचे पूर्ण नियंत्रण अजूनही झाले नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

औरंगाबाद व जालना जिल्हा मका पिकाचे हब मानले जाते. मराठवाड्यात यंदा लागवड झालेल्या २ लाख ४९ हजार २९८ हेक्‍टरवरील मका पिकाच्या क्षेत्रापैकी इतर जिल्ह्यांतील तुरळक लागवड वगळता औरंगाबाद व जालना जिल्ह्यातच मक्याचे सर्वाधिक क्षेत्र आहे. इतरही जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणातील मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तिच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून व कृषी विद्यापीठाकडून उपाययोजनांसाठी जनजागृती सुरू आहे. मात्र, अळी नियंत्रणात आली नसल्याची स्थिती आहे.

दोन ते तीन फवारण्या केलेल्या क्षेत्रात अजूनही २० ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत अळीचा प्रादुर्भाव आहे. एकीकडे दुष्काळी स्थिती, अळीचे आक्रमण, त्यामुळे खर्चात वाढ, यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com