Agriculture news in marathi, Corn sieving by the American fall army warm | Page 2 ||| Agrowon

अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याची चाळण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

यंदा लष्करी अळीमुळे सहा एकरांत २० हजार रुपये दोन फवारणीवर खर्च झाले. एवढे करूनही अळीचा प्रादुर्भाव आहेच. आधी लागवड केलेल्या पाच एकरांत २५ ते ३० टक्‍के तर जुलैच्या मध्यात लागवड केलेली एक एकरातील मक्याची अळ्यांनी पार चाळणी करून टाकली. 
- रामदास जाधव,पाल, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद 

साडेसात एकर मका पिकात आजवर तीन फवारण्या केल्या. प्रत्येक फवारणीला एकरी १२०० ते २२०० रुपयांपर्यंत खर्च आला. तरीही, २० ते ३० टक्‍के प्रादुर्भाव कायम आहे. पोंग्यात असलेली अळी जर कणसात गेल्यास काय करावे, हा प्रश्‍न आहे. 
- रावसाहेब शिंदे, नाचनवेल, ता. कन्नड, जि. औरंगाबाद 
 

औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीकडून मका पिकाला पोखरण्याचे काम सुरूच आहे. पोंग्यात असलेली अळी आता कणसात घुसली, तर तिचे नियंत्रण कसे करावे, हा प्रश्‍न मका उत्पादकांना पडला आहे. शिवाय, फवारणीचा खर्च तीन ते पाच हजारांपर्यंत करावा लागला. तरीही अळीचे पूर्ण नियंत्रण अजूनही झाले नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

औरंगाबाद व जालना जिल्हा मका पिकाचे हब मानले जाते. मराठवाड्यात यंदा लागवड झालेल्या २ लाख ४९ हजार २९८ हेक्‍टरवरील मका पिकाच्या क्षेत्रापैकी इतर जिल्ह्यांतील तुरळक लागवड वगळता औरंगाबाद व जालना जिल्ह्यातच मक्याचे सर्वाधिक क्षेत्र आहे. इतरही जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणातील मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तिच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून व कृषी विद्यापीठाकडून उपाययोजनांसाठी जनजागृती सुरू आहे. मात्र, अळी नियंत्रणात आली नसल्याची स्थिती आहे.

दोन ते तीन फवारण्या केलेल्या क्षेत्रात अजूनही २० ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत अळीचा प्रादुर्भाव आहे. एकीकडे दुष्काळी स्थिती, अळीचे आक्रमण, त्यामुळे खर्चात वाढ, यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...