महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ६४ वर

केंद्र सरकारने राज्याला कोरोना चाचण्यांची परवानगी द्यावी. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करायच्या आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ६४ वर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ६४ वर

मुंबई: केंद्र सरकारने राज्याला कोरोना चाचण्यांची परवानगी द्यावी. राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करायच्या आहेत. केवळ किट्स केंद्राने उपलब्ध करून द्याव्यात. ही आमची केंद्राकडे मागणी आहे. राज्य सरकार वैद्यकीय महाविद्यालयांना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. तसेच, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ वरून ६४ वर पोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता. २१) दिली.  दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. श्री. टोपे यांनी शरद पवारांशी सविस्तर चर्चा केली, सध्याची परिस्थिती सांगितली. या वेळी शरद पवार यांनी तातडीने केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.  केंद्राने आपल्याला चाचण्यांची परवानगी द्यावी, मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग लॅब आम्हाला करायच्या आहेत, केवळ किट्स केंद्राने उपलब्ध करून द्यावे, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्य सरकार मेडिकल कॉलेजना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. ही आमची केंद्राकडे मागणी आहे, असे टोपेंनी सांगितले. टोपे म्हणाले, शरद पवारांना महाराष्ट्राची संपूर्ण माहिती सांगितली. टेस्टिंग फॅसिलिटी उपलब्ध करून द्या असे सांगितले. सर्व लागणाऱ्या सुविधा द्या, सर्व खासगी रुग्णालयांना परवानगी दिली पाहिजे. आम्ही सर्व सुविधा देत आहोत.  मंत्री टोपे पुढे म्हणाले, की रेल्वे एकतर रोखायला हवी किंवा जे गावी जात आहेत त्यांच्यासाठी जास्तीच्या ट्रेन उपलब्ध कराव्या, अशी मागणी महाराष्ट्राने केंद्राकडे केली. कारण, बाहेरगावी जाणाऱ्यांची गर्दी वाढली असल्याने मुंबई आणि पुण्यात रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढत आहे. या गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. सर्वांना काळजी घ्यायच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले आहे की, पुढील २ ते ३ दिवस वाट बघू अन्यथा रेल्वेबाबत निर्णय घेतला जाईल, असेही टोपेंनी संकेत दिले आहेत. ज्या जीवनावश्यक सेवा आहेत, मेडिकल, फार्मसी, बँकिंग, याव्यतिरिक्त लोकांनी प्रवास टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.  त्याशिवाय विमानतळावरील पालिकेच्या डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना एन-९५ चा मास्क देणार आहे. जर नोकरीला जायचे असेल तरच लोक ट्रेनमध्ये बसतात. ज्या जीवनावश्यक सेवा आहेत. त्या लोकांनी जरूर ट्रेनमध्ये बसावे. पण इतरांनी प्रवास करूच नये. उद्या पंतप्रधानांनी कर्फ्यूचे पालन करायला सांगितले आहे. त्याचे प्रत्येकांनी पालन करा, असे आवाहनही टोपे यांनी केले. मुकाबला करुया, कोरोनाला हरवूयाः महसूलमंत्री कोरोनाचे संकट काळजी वाढवणारे आहे. आपल्या सर्वांना आपली, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्यावी लागणार आहे. मला काही होणारच नाही, ही कल्पना खोटी ठरू शकते. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नका. विवाह समारंभात मोठ्या प्रमाणात लोकं एकत्रित येत आहेत, हे टाळलंच पाहिजे. आपण सर्व सामूहिक पद्धतीने काळजी घेऊन, जागरूक राहून कोरोनाच्या या संकटाचा मुकाबला करूया, कोरोनाला हरवूया, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.  तीन रिपोर्टबाबत साशंकता राज्यात शुक्रवारी दिवसभरात ११ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये १० रुग्ण मुंबईचे तर १ पुण्याचा नवा रुग्ण आढळला आहे. यापैकी तिघांना संपर्क आल्यामुळे तर परदेशातून आलेल्या ८ जणांना लागण झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या ६४ वर पोचली आहे. इतर ३ रिपोर्टबाबत साशंकता आहे. जरी एखाद्या रुग्णाच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या तरी आपण त्यांना क्वारंटाइन करत आहोत. लॅब वाढवण्याची गरज आहे. त्याबाबत शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com