Agriculture news in marathi Corona Correspondent closed weekly market in Sindhudurg district | Agrowon

कोरोनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवडे बाजार राहणार बंद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

सिंधुदुर्ग : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत भरविण्यात येणारे आठवडा बाजार बंद केले आहेत. बाजार बंदची माहिती व्यापाऱ्यांना वेळेत न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ झाला. 

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकांवर बारीक लक्ष ठेवले आहे. संशयास्पद लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडला, अशी अफवा पसरविणाऱ्या तीन स्थानिक वृत्तवाहिन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पोलिसांना दिले आहेत.

सिंधुदुर्ग : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत भरविण्यात येणारे आठवडा बाजार बंद केले आहेत. बाजार बंदची माहिती व्यापाऱ्यांना वेळेत न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ झाला. 

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकांवर बारीक लक्ष ठेवले आहे. संशयास्पद लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण सापडला, अशी अफवा पसरविणाऱ्या तीन स्थानिक वृत्तवाहिन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पोलिसांना दिले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आणखीनच सतर्क झाला आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकांची जिल्हा सीमेवरच तपासणी केली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

तालुका किंवा इतर प्रमुख ठिकाणी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजारांमध्ये इतर जिल्ह्यातील शेकडो व्यापारी येतात. याशिवाय आठवडा बाजारांमध्ये मोठी गर्दी होते. ती टाळण्यासाठी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वैभववाडी येथे बुधवारी भरविण्यात येणारा बाजार अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आलेल्या शेकडो व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.

दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडून संशयास्पद लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. आरोग्य विभाग कोणतीही जोखीम उचलण्यास तयार नाही, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी अतिशय सर्व स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला, अशी बातमी जिल्ह्यातील तीन स्थानिक वेब पोर्टल वृत्तवाहिन्यांनी दिली होती. प्रत्यक्षात जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. त्या तीनही वृत्तवाहिन्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...