Agriculture news in marathi 'Corona' effect on kharip crop loan distribution in Akola | Agrowon

अकोल्यात खरिप पीक कर्जवाटपावर ‘कोरोना’चे सावट

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020


‘लॉकडाऊन’मुळे सध्या पीककर्ज वाटप सुरु नाही. ही परिस्थिती सुरळीत होताच पात्र शेतकऱ्याला पीककर्ज देण्याची बॅंकेची संपूर्ण तयारी झाली आहे. स्थिती सुधारण्याची प्रतीक्षा करीत आहोत. 
- अनंत वैद्य, महाव्यवस्थापक, अकोला जिल्हा बॅंक. 

अकोला : ‘लॉकडाउन’मुळे संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत. बॅंकिंगवर मर्यादा आल्या आहेत. यामुळे आगामी खरिप हंगामासाठी पीककर्ज वाटप करण्यावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. तशी शक्यता तज्ज्ञांना वाटू लागली आहेत. येत्या हंगामासाठी पीककर्ज वाटप करायचे असल्यास आतापासूनच मायक्रो प्लॅनिंग करावे लागेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. 

यंदा मॉन्सूनचे मे महिन्याच्या अखेरीस देशात आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जूनमध्ये महाराष्ट्रातही मॉन्सून येऊन कदाचित पेरण्यांना सुरुवात होऊ शकते. यामुळे हंगामासाठी शेतकऱ्यांना बि-बियाणे, खत खरेदीसह इतर कामांसाठी पीककर्जाची नितांत आवश्यकता राहणार आहे. 

दरवर्षी १ एप्रिलपासून पीककर्ज वाटपाला सुरुवात केली जाते. यंदा मात्र, ‘कोरोना’मुळे सुरु झालेल्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम पीककर्ज वाटपावर थेट झाला. बॅंकांचे कामकाज विविध जिल्ह्यांमध्ये अवघे चार तास करण्यात आले आहे. तेथील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही कमी आहे. ‘जनधन’चे पाचशे रुपये काढण्यासाठीच बॅंकांसमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. पीककर्ज वाटप सुरु केल्यास बॅंकांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागण्याची भीती आहे. 

पीककर्जासाठी आवश्‍यक कागदपत्रेही सद्यस्थितीत मिळेनाशी झाली आहेत. ती मिळविणे संचारबंदीत शक्य नाही. सोबतच कर्जमाफीची प्रक्रीयाही पूर्ण झाली नसल्याने अनेकजण अद्यापही कर्जदार आहेत. ते आता थकीत झाले, तर त्यांना पुढील हंगामासाठी पुन्हा पीककर्ज मिळण्याची शक्यता नाही. 

‘लॉकडाउन’वर पीककर्जाचे भवितव्य 

कर्जमाफीची प्रक्रिया लॉकडाऊन उठल्यानंतर किती वेगाने राबवली जाते, यावरही पीककर्ज मिळणे अवलंबून आहे. जिल्हा बॅंकांचे पीककर्ज वाटप हे सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे त्यांना यातून मार्ग काढताही येईल. प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँकांना असंख्य अडचणी येऊ शकतात. या बॅंकांच्या शाखांमध्ये कर्जवाटपासाठी कर्मचारी संख्या, इंटरनेट कनेक्टीव्हीटी, याबाबत ओरड आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...