Agriculture news in marathi Corona 'grape growing farmers in crisis | Agrowon

लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात  

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून सध्या संचार बंदी केली आहे. त्याचा परिणाम द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांवर झाला असून सध्या व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाने द्राक्ष उत्पादकांना मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून सध्या संचार बंदी केली आहे. त्याचा परिणाम द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांवर झाला असून सध्या व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाने द्राक्ष उत्पादकांना मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

आनंवाडी (ता. चाकूर) येथील विष्णुदास पासमे यांनी जून २००६ मध्ये दोन एकरवर द्राक्ष बाग उभी केली. गेल्या १३ वर्षांपासून ते सातत्याने द्राक्षांचे उत्पादन घेत आहेत. सध्या द्राक्षांचा तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, ‘कोरोना’ने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवल्याचे दिसून येत आहे. परिणामी बागायतदार शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्याने पासमे यांना द्राक्षांचे काय करावे, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. 

आत्तापर्यंत द्राक्ष बागेवर छाटणी, फवारणी व मजूर यासह साधारण चार लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्यांना दोन एकरावरील बागेतून यंदा २५ ते ३० टन द्राक्षांचे उत्पादन अपेक्षित आहे. अजून आठ दिवस झाडावरील द्राक्ष सुस्थितीत राहतील. मात्र, नंतर ते खराब होतील. पासमे यांच्याकडून दरवर्षी छत्तीसगड, हैद्राबाद, अकोला, बुलढाणा, वाशीम व अंबाजोगाई येथील व्यापारी जाग्यावरून द्राक्षांची खरेदी करतात. मात्र, ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद आहेत. 

वाहतुकीची साधने नाहीत. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विक्री होत नसल्याने व्यापारी यायला तयार नाहीत. त्यात अधूनमधून ढगाळ वातावरण व अल्पप्रमाणात पाऊस ही पडत आहे. अशातच जर गारपीट अथवा वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तर द्राक्ष मातीमोल होतील, या भीतीने पासमे यांची झोपच उडाली आहे. 

दिवसरात्र एक करून मोठ्या मेहनतीने द्राक्ष बागेचे संगोपन केले. परिणामी चांगले उत्पादन पदरात पडले. मात्र, ‘कोरोना’मुळे डोळ्यासमोर द्राक्षांची होत असलेली नासाडी पहावत नाही. व्यापाऱ्याला दररोज फोन करत आहे पण कोणीही यायला तयार नाही. यावर्षी खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे. आता शासनानेच आम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आधार द्यावा. 
- विष्णुदास पासमे, 
द्राक्ष उत्पादक आनंदवाडी.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...