जागतिक कापूस लागवडीवर ‘कोरोना इम्पॅक्ट’   

उत्तर भारतात कापूस लागवड सुरू आहे. परंतु लॉकडाऊनमुळे ही लागवड रखडत सुरू आहे. भाक्रा नांगल प्रकल्पातून पाटचाऱ्यांना मुबलक पाणी सोडले जात आहे. आमच्या भागातील कापसाखालील कमाल क्षेत्र ओलिताखाली असेल. राजस्थानमधील भिलवाडा, श्रीगंगानगर भागातील लागवड आठवडाभरानंतर सुरू होईल, असे वाटते. उत्तर भारतातील क्षेत्र स्थिर राहील, असे मला वाटते. - महेश सारडा, इंडियन कॉटन असोसिएशन
cotton
cotton

जळगाव ः नव्या कापूस हंगामाला जगात सुरवात झाली असून, अमेरिका, चीन या आघाडीच्या देशांमध्ये लागवड सुरू झाली आहे. जगात लागवड नव्या हंगामात १२ ते १४ टक्‍क्‍यांनी कमी होवू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.  कोरोनाचे थैमान आघाडीच्या कापूस उत्पादक देशांमध्ये सुरूच आहे. ही समस्या केव्हा दूर होईल? याची शाश्‍वती नाही. बाजार ठप्प आहे. निर्यातीबाबतही सकारात्मक स्थिती नाही. याचा परिणाम अमेरिका, चीन व भारताच्या कापूस लागवडीवर होणार आहे. अमेरिकेतील टेक्‍सास व इतर भागात लागवड सुरू झाली आहे. चीनमध्येही जिझियांग, यंगत्से नदीच्या खोऱ्यातील लागवडीला प्रारंभ झाला आहे. उत्पादनाचे असे आहे गणित... अमेरिकेत दरवर्षी ४२ ते ४३ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड केली जाते. तेथे २५४ ते २६० लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढे कापूस उत्पादन होते. तेथे सप्टेंबरमध्ये वेचणी सुरू होते. अमेरिकेच्या ९५ टक्के कापसाची निर्यात केली जाते. चीन हा अमेरिकेच्या कापसाचा मोठा खरेदीदार आहे. यासोबत व्हीएतनाम, बांगलादेशातही अमेरिकेच्या  कापसाची मागणी असते. चीनमध्ये दरवर्षी ३३ ते ३४ लाख हेक्‍टर कापसाची लागवड असते. तेथेही सप्टेंबरच्या सुरवातीलाच वेचणी सुरू होते. तेथे ३५० ते ३५५ लाख गाठी उत्पादन होते. पाकिस्तानमधील पंजाब व लगत लागवड पूर्ण झाली असून, तेथे क्षेत्र सुमारे २७ लाख हेक्‍टरवर लागवड झाली आहे. तेथे १२२ ते ११८ लाख गाठींचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. तर जगात सर्वाधिक कापूस लागवड भारतात केली जाते. २०१९-२० मध्ये भारतात १२२ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. तर ३६० लाख म्हणजेच जगात सर्वाधिक कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. कोरोनामुळे प्रक्रिया ठप्प असल्याने गाठींचे उत्पादन पूर्णतः हाती आलेले नाही.

नव्या हंगामात चीनमध्ये १० ते १२ टक्के, अमेरिकेत १२ ते १३ टक्के आणि भारतातही दोन ते तीन टक्के कापूस लागवड कमी होवू शकते. भारतात महाराष्ट्र, तेलंगण, मध्य प्रदेश, गुजरातेत लागवड कमी होवू शकते. महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक भागात कोरडवाहू कापूस अधिक असतो. देशात एकूण लागवड ११८ ते ११९ लाख हेक्‍टरपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. 

देशात पंजाब, हरियाणा भागात लागवड सुरू झाली आहे. पंजाबमध्ये भात लावणीसंबंधी मजूरटंचाई असते. यामुळे पंजाबमध्ये कापूस लागवड वाढू शकते. १५ मे पर्यंत या तीन्ही राज्यांमधील लागवड पूर्ण होईल. यंदा पंजाब,  हरियाणा व राजस्थानात मिळून साडेतेरा ते १४ लाख हेक्‍टरवर लागवड होईल, अशी माहिती मिळाली.  प्रतिक्रिया देशातील कापूस लागवडीचा अंदाज मे महिन्यात नेमकेपणाने व्यक्त करता येईल. कापसाला अनेक भागात चांगले पर्यायी पीक नाही. सध्या बाजार अस्थिर असला तरी पुढे शासनाकडून ठोस कार्यवाही झाली तर बाजार सावरेल. कापूस लागवड देशात फारशी कमी होणार नाही, असे वाटते.  - प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनींग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com