agriculture news in Marathi corona impact on karnatki bendur Maharashtra | Agrowon

कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

कच्चा मालाच्या तुटवड्यामुळे बैल सजावटीचे साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहे. दरवर्षी शेतकरी हौसेने साहित्याची खरेदी करतात. यंदा कोरोनामुळे बेंदूर साजरा करण्यावर मर्यादा आल्याने शेतकऱ्यांचा खरेदीस उत्साह नाही.
- अजित पाटील, विक्रेते

कोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७) साजरा होत आहे. मात्र, कोरोनाचे सावट यंदाच्या बेंदुरावर स्पष्ट दिसत आहे. कर्नाटक व कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक लगतच्या भागात हा बेंदूर साजरा केला जातो. 

बैलापासून बैल सजविण्यासाठी लागणारे साहित्य आणि शेतकऱ्यांच्या उत्साहापासून कर तोडण्याच्या सामुहिक कार्यक्रमांवर कोरोनाने नांगर फिरविले आहे. लॉकडाउनमुळे सुताचा दोरा आदी कच्चा माल तयार न झाल्यामुळे बैलासाठी लागणारा दोरा व अन्य साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे

बाजारपेठेत जे विक्रेते दरवर्षी बेंदुराला चार ते पाच लाखांची उलाढाल करतात त्याच विक्रेत्यांनी यंदा कमी भांडवल गुंतवून कसेबसे साहित्य विक्रीस ठेवले आहे. बेंदूर सण म्हणजे बैल सजावट, मिरवणूक आणि सायंकाळी कर तोडणीचा सामूहिक कार्यक्रम यांची रेलचेल असते. मात्र यावर कोरोनामुळे मर्यादा आल्याने बळीराजाचा बेंदुरातील उत्साह गायब झाला आहे. बाजारपेठेतील खरेदीस शेतकऱ्यांची लगबग कमीच आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील काही गावे व कर्नाटक सीमा भागात कर्नाटकी बेंदूर साजरा करतात. कोरोनाच्या स्थितीतही विक्रेत्यांनी बाजारपेठेत बैल सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवले आहे. कासरा, गोंडे, माळा, कवड्यांच्या माळा, घुंगरू पट्टे, हनपट, कंडा असे विविध आकर्षक साहित्य विक्रीस आहे. यंदा साहित्याचे दरही जैसे थे आहेत.  प्रमुख पशुधन साहित्य विक्रेत्यांकडून हे साहित्य विक्रीसाठी आहे. तसेच प्रमुख मार्गावर कुंभार व्यावसायिक बैल जोड्यांचे स्टॉल लावत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...