जालन्यातील मोसंबी उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका

भाव वाढतील अशी अपेक्षा बाळगून होतो. सुरवातीला साठ हजार रुपायांत मागितलेला बगीचा दिला नाही. नंतर विक्रीच होत नसल्याने झाडांची फळे अखेर तोडून टाकावी लागली. - काशिनाथ शिंदे, मोंसबी उत्पादक मोसंबी फळबागाची सुरुवातीला विक्री केली होती. अर्धा माल तोडून नेला. मात्र नंतर कोरोनाचे संकट उद्भवले. लॅाकडाऊन सुरु झाल्याने मोसंबी फळाची तोडणी करता न आल्याने तशीच झाडाला लटकून राहिली. अखेर फळे तोडून झाडाखाली ढिगारा घातला आहे. - संतोष शिंदे, मोंसबी उत्पादक शेतकरी
Corona in Jalna hits citrus growers
Corona in Jalna hits citrus growers

अंबड, जि. जालना : कोरोना संकट काळातील लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका मोंसबी उत्पादकांना बसला आहे. वाहतूक व बाजार व्यवस्था ठप्प राहिल्याने झाडावरच लटकून राहिलेली फळे जागेवरच तोडून टाकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. 

लॅाकडाउनमुळे बाजारपेठा व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्या. खरेदी-विक्रीच्या व्यवहराला पूर्णपणे खिळ बसली. मोसंबी उत्पादकांना लॅाकडाऊन हटून व्यवहार सुरळीत सुरु होतील, अशी आशा वाटत होती. मात्र, झाले उलटे जवळपास दीड ते दोन महिने सर्वच बंद राहिले. या काळात मोसंबी उत्पादकांना आपल्या फळबागा विक्री करता आल्याच नाहीत. त्यातच पाणी टंचाईचे सावट राहिले. विक्रीला आलेल्या फळांवर विपरीत परिणाम झाला. कमी पाण्यामुळे फळांचे वजन घटू लागले. गळ होऊन मोठे नुकसान होऊ लागले. 

कोरोनाच्या महामारीत भरडल्या गेलेल्या मोसंबी उत्पादकांची अर्थिक विवंचना सारखी वाढत गेली. भाव वाढतील, अशी अशा बाळगत बसलेल्या मोसंबी उत्पादकांचे स्वप्न भंग पावले. मोसंबीचे भाव प्रचंड प्रमाणात गडगडले. फळबागा तोडून विक्रीसाठी बाजारात घेऊन जाव्यात, तर वाहतूक, तोडणी खर्च परवडणारा नाही. यामुळे फळगांची विक्री होऊच शकली नाही. त्यामुळे मोंसबी उत्पादकांनी झाडाची फळे विक्री अभावी जाग्यावर तोडून टाकणे पसंत केले. अनेक फळबागेत फळाच्या झाडाखाली सडा पडून मोठया प्रमाणा नासाडी झाल्याचे चित्र आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com