agriculture news in marathi Corona in Jalna hits citrus growers | Page 2 ||| Agrowon

जालन्यातील मोसंबी उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

भाव वाढतील अशी अपेक्षा बाळगून होतो. सुरवातीला साठ हजार रुपायांत मागितलेला बगीचा दिला नाही. नंतर विक्रीच होत नसल्याने झाडांची फळे अखेर तोडून टाकावी लागली. 
- काशिनाथ शिंदे, मोंसबी उत्पादक 

मोसंबी फळबागाची सुरुवातीला विक्री केली होती. अर्धा माल तोडून नेला. मात्र नंतर कोरोनाचे संकट उद्भवले. लॅाकडाऊन सुरु झाल्याने मोसंबी फळाची तोडणी करता न आल्याने तशीच झाडाला लटकून राहिली. अखेर फळे तोडून झाडाखाली ढिगारा घातला आहे. 
- संतोष शिंदे, मोंसबी उत्पादक शेतकरी 

अंबड, जि. जालना : कोरोना संकट काळातील लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका मोंसबी उत्पादकांना बसला आहे. वाहतूक व बाजार व्यवस्था ठप्प राहिल्याने झाडावरच लटकून राहिलेली फळे जागेवरच तोडून टाकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. 

लॅाकडाउनमुळे बाजारपेठा व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्या. खरेदी-विक्रीच्या व्यवहराला पूर्णपणे खिळ बसली. मोसंबी उत्पादकांना लॅाकडाऊन हटून व्यवहार सुरळीत सुरु होतील, अशी आशा वाटत होती. मात्र, झाले उलटे जवळपास दीड ते दोन महिने सर्वच बंद राहिले. या काळात मोसंबी उत्पादकांना आपल्या फळबागा विक्री करता आल्याच नाहीत. त्यातच पाणी टंचाईचे सावट राहिले. विक्रीला आलेल्या फळांवर विपरीत परिणाम झाला. कमी पाण्यामुळे फळांचे वजन घटू लागले. गळ होऊन मोठे नुकसान होऊ लागले. 

कोरोनाच्या महामारीत भरडल्या गेलेल्या मोसंबी उत्पादकांची अर्थिक विवंचना सारखी वाढत गेली. भाव वाढतील, अशी अशा बाळगत बसलेल्या मोसंबी उत्पादकांचे स्वप्न भंग पावले. मोसंबीचे भाव प्रचंड प्रमाणात गडगडले. फळबागा तोडून विक्रीसाठी बाजारात घेऊन जाव्यात, तर वाहतूक, तोडणी खर्च परवडणारा नाही. यामुळे फळगांची विक्री होऊच शकली नाही. त्यामुळे मोंसबी उत्पादकांनी झाडाची फळे विक्री अभावी जाग्यावर तोडून टाकणे पसंत केले. अनेक फळबागेत फळाच्या झाडाखाली सडा पडून मोठया प्रमाणा नासाडी झाल्याचे चित्र आहे. 

 


इतर अॅग्रो विशेष
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...