Agriculture news in marathi Corona kills 28 in agriculture uptill now | Agrowon

कृषी विभागात कोरोनामुळे आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

राज्यात आतापर्यंत ५३० जण कोरोनाबाधित झालेली आहे. तर २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या काही दिवसांपासून चांगलेच थैमान घातले आहे. या लाटेत कृषी विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कवेत घेतले आहे. राज्यात आतापर्यंत ५३० जण कोरोनाबाधित झालेली आहे. तर २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सध्या राज्यात कृषी विभागाकडून येत्या खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे. मात्र वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण लवकर करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. संबधित जिल्हाधिकारी यांनी लसीकरणाबाबतची कार्यवाही लवकर केल्यास स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांना कृषी विभागाच्या योजनांना गती मिळणार असल्याची बाबही निदर्शनास आणण्यात आली आहे. कोरोनाची गंभीरता विचारात घेता कृषी विभागातील सर्वांना प्राधान्याने लसीकरण केल्यास स्थानिक कामकाजावर प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कृषी विभागाच्या कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांशी व त्यांच्या संलग्न यंत्रणेशी जनसंपर्क करावा लागतो. त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचाऱ्यांना विभागाशी निगडित विविध कामे करावी लागतात. हे करत असताना अनेक शेतकऱ्यांशी योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कामे करावी लागतात. तसेच योजनेची अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करणे, कृषी विभागाचे मेळावे, प्रशिक्षण आयोजित करणे, अशी कामे करत असताना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागतात. त्याचप्रमाणे महसूल विभागाकडील निवडणुकीचे कामकाज तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे करावयाचे नुकसानभरपाईची कामे, पंचनामे अशी विविध कामे करावी लागतात. 

कोरोनाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या विविध विभागांच्या यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यास सुरुवात केली आहे. सद्यःस्थितीत कोरोनावाढीची गंभीर स्थिती विचारात घेता, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना फ्रंटलाइन वर्कर्सप्रमाणे प्राधान्याने कोविडचे लसीकरण करण्याबाबत संबंधित विभागास सूचना देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी कळविले आहे. परंतु त्यास फारशी गती आलेली नसल्याचे दिसून येते. 

विमा जाहीर करावा 
गतवर्षी ग्रामसेवक, सर्व आरोग्य सेवक, तलाठी, पोलिस कर्मचारी यांना शासनाने ५० लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा जाहीर केला होता. त्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी हे देखील स्थानिक स्तरावर जाऊन काम करत असल्याने त्यांनाही आरोग्य विमा जाहीर करावा, अशी मागणी अधिकारी, कर्मचारी यांनी केली आहे. 


इतर बातम्या
विदर्भात पूर्वमोसमीचा जोर वाढणार पुणे : हिंद महासागराचा परिसर आणि अरबी समुद्राचा...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
कृषी निविष्ठा केंद्रे सुरू ठेवण्याचा...सांगली ः जिल्ह्यात १५ मे नंतर लॉकडाउन संपल्यानंतर...
नगर जिल्हा बॅंकेकडून मुख्यमंत्री...नगर ः कोरोना संकटाच्या सामन्यासाठी मदत म्हणून नगर...
बुलडाण्यात शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल...बुलडाणा ः कोरोना संसर्गाची साखळी मोडून...
पारनेर बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री...नगर ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पारनेर कृषी...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...पुणे ः राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
समूह सहायक, कृषी सहायकांनी पोकराच्या...अकोला : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पात निवड...
`किमतीची शहानिशा करूनच रासायनिक खते...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांनी बॅगवरील किमतीची शहानिशा...
जळगावात वितरकांकडे कापूस बियाणे दाखल जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी शेतकरी जशी उमेदीने...
साखर संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस...कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे...
कांदा बियाणे मळणीला खानदेशात आला वेगजळगाव ः खानदेशात कांदा बियाणे मळणी सुरू आहे. मळणी...
नांदेड जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यूनांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मागील काही...
एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक...सोलापूर : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच...
हळदीच्या मुल्यसाखळीचा अभ्यास करावा ः...हिंगोली ः ‘‘शेतकऱ्यांनी हळद पिकाच्या मुल्यसाखळीचा...
नाशिकमध्ये पूर्वमोसमी पावसाचा ४५९...नाशिक : जिल्ह्याच्या विविध भागात एप्रिल...