मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
बातम्या
‘कोरोना’चा स्ट्रॅाबेरी उत्पादकांना दणका
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीचा गोडावा कोरोना विषाणूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कमी झाला आहे. चार दिवसांपासून स्ट्रॅाबेरी शेतातच पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीचा गोडावा कोरोना विषाणूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कमी झाला आहे. चार दिवसांपासून स्ट्रॅाबेरी शेतातच पडून राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
राज्यात सर्वाधिक स्ट्रॅाबेरी महाबळेश्वर तालुक्यात केली जाते. येथील शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन स्ट्रॅाबेरी पिकांवर होत असल्याने हा हंगामाची वाट पाहिली जाते. स्ट्रॅाबेरी हंगाम सुरू होण्या अगोदरच जोरदार पाऊस झाल्यामुळे स्टॅाबेरी रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातूनही लागवड शेतकऱ्यांकडून स्ट्रॅाबेरीची लागवड केली होती.
महाबळेश्वर तालुक्यात साधारणपणे २२०० ते २४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. लागवड झाल्यानंतर पुन्हा पाऊस झाल्याने स्ट्रॅाबेरी पाण्याखाली गेली होती. लागवड झालेल्यांपैकी क्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्रावरील रोपे खराब झाली होती. रोपे खराब झाल्यामुळे लागवडीचे क्षेत्र घटले होते. त्यानंतर वारंवार वातावरणातील बदल झाल्यामुळे स्ट्रॅाबेरी पिकावर हानिकारक परिणाम झाले होते.
शनिवारपासून वाहतूक यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे स्ट्रॅाबेरी बाहेर पडण्यास बंद झाली आहे. स्ट्रॅाबेरीचा अंतिम हंगाम टप्पा सुरू असतानाच फळे विक्री करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून तोडणी बंद केली आहे. यामुळे स्ट्रॅाबेरी शेती लालीलाल दिसून येत आहे. अशीच अवस्था राहिल्यास स्ट्रॅाबेरी काढून टाकावी लागणार आहे. एकुणच स्ट्रॅाबेरीवर हंगामाच्या सुरुवातीपासून विविध हानिकारक परिणाम झाल्याने हंगाम तोट्यात गेला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
प्रतिक्रिया..
महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक स्ट्रॅाबेरी आहे. या पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन असते. हा हंगाम सुरुवातीपासून अड़चणीत सापडला आहे. विविध समस्यांमुळे शेतकऱ्यांचे भांडवल निघणार नसल्याने आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.
- बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष अखिल भारतीय स्ट्रॅाबेरी उत्पादक संघ.
- 1 of 1494
- ››