Agriculture news in Marathi corona long time impact on economi ः Sharad Pawar | Agrowon

‘कोरोना’चे राज्य अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम ः शरद पवार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 एप्रिल 2020

मुंबई : ‘‘देशात ‘कोरोना’चा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न होत आहे. पण, देशात ‘कोरोना’चे संकट वाढत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, धंदे बंद आहेत. कामगारांची जबाबदारी आणि वाढवणारे कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्रे आहेत. त्यामुळे ‘कोरोना’मुळे राज्यावर अर्थसंकट येणार आहे. ते आलेले आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे परिणाम एक ते दोन वर्षे जाणवतील,’’ असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे. 

मुंबई : ‘‘देशात ‘कोरोना’चा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न होत आहे. पण, देशात ‘कोरोना’चे संकट वाढत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग, धंदे बंद आहेत. कामगारांची जबाबदारी आणि वाढवणारे कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्रे आहेत. त्यामुळे ‘कोरोना’मुळे राज्यावर अर्थसंकट येणार आहे. ते आलेले आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे परिणाम एक ते दोन वर्षे जाणवतील,’’ असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे. 

श्री. पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बुधवारी (ता. १५) नागरिकांशी संवाद साधला. 

पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने राज्यातील जनतेशी सुसंवाद करीत आहेत आणि जनतेला धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर इतर राज्य प्रमुखदेखील त्या-त्या राज्यातील जनतेशी चांगला सुसंवाद साधत आहेत. यापूर्वीचा लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिल पर्यंतचा होता. यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. त्याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे. तसेच एकंदरीत परिस्थिती बघता देशातील स्थिती चिंताजनक आहे. अमेरिका, चीन, इटली येथील परिस्थिती भयावह आहे. भारताचा विचार करता सामूहिक प्रतिकार शक्ती भारतात जास्त आहे, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र, आत्ताचा आकडा बघता सध्याची स्थिती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत देशात ३७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वैद्यकीय सेवा, अन्नधान्यांची पूर्तता करण्यासंदर्भात खबरदारी घेण्यात आली आहे.

राजकारणाची ही वेळ नाही ः पवार
बांद्रा रेल्वे स्थानकावर जे घडले ते दुर्देवी आहे. कोणीही अफवा पसरवू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. देशावर संकट आले असताना राजकारण करण्याची आवश्यकता नाही. आज आपण सर्वांनी मिळून ‘कोरोना’चा पराभव करण्याचा एक कलमी कार्यक्रम आपल्यापुढे आहे. अस्वस्थ समाजातील घटकांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.

सीएसआर फंड मुख्यमंत्री निधीतही उपलब्ध करून द्या
‘कोरोना’ हा काही २-३ महिन्यांचा विषय नाही. या संकटाला वर्ष ते २ वर्षही लागू शकतो. केंद्र सरकार चांगले निर्णय घेत आहे. मात्र, या व्यतिरिक्तही त्यांनी अनेक चांगले निर्णय घेण्याची गरज आहे. सीएसआर फंड ही राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीतही उपलब्ध करून दिली तर मदत होईल.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...