Agriculture news in marathi Corona monitoring team now at village level in Wardha district | Agrowon

वर्धा जिल्ह्यात गावस्तरावर आता कोरोना निगराणी पथक 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

वर्धा ः नागपूर, अमरावती, यवतमाळ या कोरोनाबाधित जिल्ह्यातून आडमार्गाने येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी गावस्तरिय कोरोना निगराणी पथक स्थापन करण्यात आले आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली हे पथक काम करेल. या पथकामार्फत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना अटकाव केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली. 

वर्धा ः नागपूर, अमरावती, यवतमाळ या कोरोनाबाधित जिल्ह्यातून आडमार्गाने येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी गावस्तरिय कोरोना निगराणी पथक स्थापन करण्यात आले आहे. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली हे पथक काम करेल. या पथकामार्फत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना अटकाव केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली. 

आजपर्यंत नागरिकांच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्याला कोरोनामुक्‍त ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले. आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. नागपूर, यवतमाळ आणि अमरावती हे तीन जिल्हे रेडझोनमध्ये आले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्‍त वर्धा जिल्ह्यात आता गावसिमाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्ह्यात चोरमार्गाने प्रवेश करणाऱ्यांची संख्या रोज १५० ते २०० अशी आहे. आजवर १८ हजार ५०९ नागरिक इतर जिल्ह्यातून वर्धामध्ये आले आहेत. अशाप्रकारे इतर जिल्ह्यातून नागरिक आल्यास कोरोनाबाधित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावस्तरावर कोरोना निगराणी पथक स्थापन करण्यात येणार आहे. या संदर्भात माहितीकरिता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी झूम मीटव्दारे सरपंचाशी संवाद साधला. 

असे आहे पथक 
सरपंच या पथकाचे अध्यक्ष राहतील. तर गावातील दहा ते १५ व्यक्‍ती त्यात प्रामुख्याने युवकांचा समावेश राहणार आहे. गावचे रस्ते वाहतूकीस बंद करतील, गावात अवैध मार्गाने येणाऱ्या नागरिकांवर लक्ष्य ठेवतील. शासनाची परवानगी नसलेल्या व्यक्‍तींना प्रवेश नाकारतील व त्याची माहिती संबंधित तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना तत्काळ देतील. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...