नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कायम

नगर जिल्ह्यात आठ दिवसांपासून कोरोना रुण्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
Corona in Nagar district The pace of growth continues
Corona in Nagar district The pace of growth continues

नगर ः नगर जिल्ह्यात आठ दिवसांपासून कोरोना रुण्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांपासून दररोजच्या रुग्णवाढीचा वेग दीड हजारांच्या पुढे गेला आहे. रुग्णवाढीत नगर शहर त्यापाठोपाठ संगमनेर, पारनेर पुढे आहेत.  नगर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठा त्रास लोकांना सोसावा लागला होता. आता पुन्हा तिसरी लाट सुरू झाली असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभरात १५४४ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी दररोज साधारण ६० ते ७० रुग्ण दररोज बाधित आढळत होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णवाढीत नगर शहर अव्वल असून येथे दररोज पाचशे ते सहाशे बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यापाठोपाठ नगर ग्रामीण, पाथर्डी, अकोले, संगमनेर, श्रीरामपूर आघाडीवर आहे. रुग्णवाढीमुळे रुग्णालयातही रुग्णभरती वाढत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेसह अन्य सरकारी कार्यालयातही बाधितांची संख्या वाढत असून, आरोग्य विभागात काम करणारेच बाधित होत आहेत. नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ५४ हजार ८७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के झाले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे व नियम पाळण्याचे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com