कोरोनामुळे राज्यात चौथा मृत्यू

मुंबई : मुंबईत आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यूएईहून अहमदाबादला परतलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. महाराष्ट्रातील चौथ्या बळीची नोंद झालेली आहे.
मुंबई : मुंबईत आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

६५ वर्षीय पुरुष रुग्णाला ताप, खोकला आणि श्वसनाचा होत असल्यामुळे २३ मार्चला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात आण्यात आले होते. ते यूएईला प्रवास करुन १५ मार्चला अहमदाबादला आले होते, तर २० मार्चला मुंबईत आले होते.

संबंधित रुग्णाला उच्चरक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता. प्रकृती गंभीर झाल्यामुळे उपचारादरम्यान सोमवारी ता. २३ मार्च संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे कोविड-१९ चाचणीचे निदान पॉझिटिव्ह आले होते.

दरम्यान, काल मुंबईतील १२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी ठरताना दिसत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com