जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले 

बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने बाजारात उत्साह निर्माण झालेला असताना युरोपात विशेषत: जर्मनीत कोरोनाने पुन्हा हाहाकार माजविला आहे. गेल्या चोवीस तासात ५० हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले 
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले 

बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने बाजारात उत्साह निर्माण झालेला असताना युरोपात विशेषत: जर्मनीत कोरोनाने पुन्हा हाहाकार माजविला आहे. गेल्या चोवीस तासात ५० हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दीड वर्षातील हा सर्वोच्च आकडा मानला जात आहे. तसेच चोवीस तासात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीचे नामांकित ख्रिश्‍चियन ड्रॉस्ट्रन यांनी आगामी काळात मृतांचा आकडा एक लाखांचा आकडा पार करेल, अशी भीती व्यक्त केली.  जर्मनीच्या सॅक्सोनी राज्यात पॉझिटिव्हीटीचा दर सर्वाधिक आहे. गेल्या सात दिवसात दररोज एक लाख लोकांमागे ४५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या राज्यात लस न घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. लसीकरणाचा दर हा ७० टक्कयांपेक्षा कमी असल्यामुळे सरकारकडून लस घेण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे. लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आगामी काळात संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी लसीकरणाला विरोध केला आहे. सत्तेत आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन लागू केला जाणार नाही, असे या पक्षाकडून सांगण्यात येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com