देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरात

नवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या ८७५ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात रुग्णसंख्या १४९ ने वाढली आहे.
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरात
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरात

नवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या ८७५ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात रुग्णसंख्या १४९ ने वाढली आहे. भारतात कोरोनाचा कहर सध्या तिसऱ्या टप्प्यात असून या टप्प्यात कुठून कुठे कोरोनाचा संक्रमण होत किंवा झाले आहे याची माहिती मिळवणे कठीण असते आणि त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, हे प्रगत देशांमध्ये आढळून आले आहे. दुसरीकडे, लॉकडाउनमुळे हजारो असंघटित कष्टकरी वर्गाला महानगरे सोडण्यावाचून पर्याय राहिला नसल्याने त्यांची स्थिती बिकट झाली आहे. लॉकडाउनपूर्वी या वर्गाची चिंता किंवा त्यांच्या पुनर्वसनाचा विचार आवश्यक होता, असेही मत मांडले जात आहे. कोरोना देशभरातल्या वाढत्या थैमानाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आयसीएमआर, राज्य सरकारे आणि इतर स्त्रोतांच्या माहितीतील आकडेवारीत अजूनही तफावत दिसत आहे. देशातील २७ राज्यांमध्ये हात-पाय पसरलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ८७५ झाली आहे. यामध्ये ४७ विदेशी लोक आहेत. मृतांचा आकडा २० वर पोहोचला असून ७९ रूग्ण कोरोनाच्या वेढ्यातून मुक्त झाले आहेत. १६५ रुग्ण संख्या असलेल्या केरळमध्ये आज कोरोनाने पहिला बळी घेतला. रुग्णसंख्येत १७५ चा आकडा गाठणाऱ्या महाराष्ट्रात बरे झालेलेही सर्वाधिक २५ रुग्ण आहेत. राज्यात आतापावेतो सात बळी गेले आहेत.  ईशान्येकडील राज्यांमध्ये मणिपूर आणि मिझोराम वगळता इतरत्र फैलाव झालेला नाही ही आशादायक बाब मानली जाते. पंतप्रधान मोदींनी आज केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करत आढावा घेतला आणि या संकटात केंद्र राज्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांना दिला. भाजपचे सर्व खासदार आणि आमदार आपले एका महिन्याचे वेतन पंतप्रधान मदत कोषात जमा करतील असे भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

रेल्वे डब्यांमध्ये उपचार रेल्वेने आगामी काळात रुग्ण संख्या वाढणार याचा अंदाज घेऊन वापरात नसलेल्या डब्यांचे रूपांतर वैद्यकीय वॉर्डात करण्याचा निर्णय अमलात आणला आहे. यानुसार काही गाड्यांमध्ये बदलही करण्यात आले असून एका डब्यामध्ये नऊ ते दहा कोरोनाग्रस्तांना उपचार करण्याची व्यवस्था करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय विद्यालये, कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी आयसोलेटेड करण्याचा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. दिल्ली सरकारने कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी सरकारी शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com