agriculture news in marathi, Corona patient crosses 1500 number, 13 died in 24 hours | Agrowon

राज्यात रूग्णसंख्या दीड हजारांच्या पुढे; कोरोनामुळे राज्यात काल १३ रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

पुणे : राज्यातील १८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असून त्याच वेळी २१० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार ५७४ वर पोचली

पुणे : राज्यातील १८८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असून त्याच वेळी २१० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार ५७४ वर पोचली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. राज्यात गेल्या शुक्रवारी (ता.१०) चोवीस तासांमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात मरण पावलेल्यांमध्ये मुंबई येथील दहा तर, पुण्यातील एका रुग्णांचा समावेश आहे. आज मरण पावलेल्यांमध्ये ९ पुरूष आणि चार महिला आहेत, असे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले. आज झालेल्या १३ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० वर्षे या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता ११० झाली आहे.

आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३३०९३ नमुन्यांपैकी ३०४७७ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १८८ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८९२७ व्यक्ती घरगुती विलगीकरण असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४ हजार ३७४ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

मुंबईतील स्थिती चिंताजनक
 राजधानी मुंबईतील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून शुक्रवारी (ता.१०) दिवसभरात २१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आता मुंबईतील बाधितांची संख्या ९९३ एवढी झाली आहे. राज्यातील रूग्णांची संख्या १ हजार ५४७ एवढी झाली आहे. मुंबईतील वाढते बाधित लक्षात घेता तेथे लॉकडाउनचे नियम कठोर केले जाणार आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. मुंबईत एका दिवसात कोरोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर आत्तापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या ६४ वर पोचली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...