पंढरपूर, मंगळवेढ्यात वाढते रुग्ण

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे गेल्या दहा दिवसांत झालेल्या गर्दीचा परिणाम आता जाणवू लागला असून, या दोन्ही तालुक्यांत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
पंढरपूर, मंगळवेढ्यात वाढते रुग्ण
पंढरपूर, मंगळवेढ्यात वाढते रुग्ण

सोलापूर ः पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमुळे गेल्या दहा दिवसांत झालेल्या गर्दीचा परिणाम आता जाणवू लागला असून, या दोन्ही तालुक्यांत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दहा दिवसांत एकट्या पंढरपूर तालुक्यात अडीच हजार रुग्ण वाढले असून, मंगळवेढ्यात ७३३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे प्रशासनाची धावपळीसह चिंता वाढली आहे. विधानसभेची पोटनिवडणूक नूकतीच घेण्यात आली. निवडणूक काळात इथला प्रचार अगदी मुक्तपणे सुरू होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने निवडणूक चांगलीच मूळावर उठल्याचे चित्र आहे. पंढरपुरात गेल्या दहा दिवसांत २५१६ रुग्ण वाढले असून, त्यात २० जणांचा जीव गेला आहे. तर मंगळवेढ्यातही ७३३ रुग्ण वाढले. तर १९ जणांचा जीव गेला आहे.  या दोन्ही तालुक्यांतच दहा दिवसांत ३९ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आजही रोज पंढरपुरातून २०० च्या पुढे, तर मंगळवेढ्यातही ३० ते ५० च्या पुढेच रुग्ण आढळत आहेत. या दोन्ही तालुक्यांतील सरकारी आणि खासगी हॅास्पिटलस या आधीच भरली आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com