देशात कोरोनाचे रुग्ण १०,००० वर; १,२११ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू

देशातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार ३६६ झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारांवर असलेला भारत जगातला २२वा देश ठरला आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण १०,००० वर; १,२११ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू
देशात कोरोनाचे रुग्ण १०,००० वर; १,२११ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार ३६६ झाली आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजारांवर असलेला भारत जगातला २२वा देश ठरला आहे. देशात १० हजार ३६६ कोरोनाग्रस्त आहेत तर, १ हजार ३३५ जण बरे झाले आहेत आणि ३४० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता.१४) एका दिवसात म्हणजे २४ तासांत १ हजार २११ नवे रुग्ण आढळले असून, ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, एखाद्या विशिष्ट ठिकाणी २८ दिवस कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तर, कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी देश सक्षम झाला, असे मानता येते. सध्याचा कल पाहता केरळसह इतरत्र ही परिस्थिती येण्यासाठी किमान १५ दिवस लागतील, असे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

देशभरात २ लाख ३१ हजार चाचण्या ‘इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च'चे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, आतापर्यंत कोरोनाच्या २ लाख ३१ हजार ९०२ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कालच्या एका दिवसात २१ हजार ६३५ चाचण्या करण्यात आल्या. कोरोना चाचण्यांसाठी आवश्‍यक असलेली ३३ लाख रॅपिड किट पुरवण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com