agriculture news in marathi corona patient reaches 8356 number in india | Agrowon

सावध असा ! देशात कोरोना रूग्णांची संख्या पोचली ८३५६ पर्यंत !

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 एप्रिल 2020

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार देशात आजअखेर कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ३५६ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत २७४ लोकांचा मृत्यू झाला असून ७१६ जण बरे झाले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार देशात आजअखेर कोरोनाग्रस्तांची संख्या ८ हजार ३५६ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत २७४ लोकांचा मृत्यू झाला असून ७१६ जण बरे झाले आहेत. देशातील पहिला कोरोना रूग्ण आढळलेल्या केरळमधील नव्या रुग्णांची नोंद गेल्या २४ तासांत पूर्णपणे थांबली असून ही सकारात्मक स्थिती मानली जाते.

कोरोनाने महाराष्ट्रात सर्वाधिक १२७, तर मध्य प्रदेशात त्याखालोखाल ३६ लोकांचा बळी घेतला आहे. मागच्या २४ तासांमध्ये देशभरात ९०९ नवे रुग्ण आढळले असून ३४ जण मृत्युमुखी पडले आहेत, त्यातील १७ जण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, सांगली हा भाग धोकादायक बनला आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी भारतामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येबाबत अजूनही परिस्थिती चांगली असल्याचे पुन्हा सांगितले, मात्र हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्या सरसकट घेणे हानिकारकच ठरू शकते याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

ते म्हणाले की, कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या फक्त वीस टक्के रुग्ण गंभीर आहेत. सरासरी काढली तर १ लाख ८६ हजार लोकांच्या चाचण्या केल्यानंतर १ लाख ८६ हजार ९०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच दिवसात दर दिवशी १५ हजार ७४७ चाचण्या करण्यात आल्या. भारतामध्ये औषधांसह मास्क, व्हेंटिलेटर तसेच व्यक्तिगत सुरक्षा उपकरणे पीपीई यांचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी पुन्हा नमूद केले. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...