agriculture news in marathi corona positive cases in Motala agriculture department office | Page 2 ||| Agrowon

मोताळा कृषी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

मोताळा येथे कृषी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत चाचणी केली असता ४० पैकी सहा जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून शासकीय कार्यालयेही सुटलेली नाहीत. मोताळा येथे कृषी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत चाचणी केली असता ४० पैकी सहा जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

गुरुवारी (ता.१५) तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी स्वतःसह आपल्या सहकाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेतली. त्यानंतर आलेल्या अहवालात दोन मंडळ कृषी अधिकारी, एक पर्यवेक्षक, दोन लिपिक, एक शिपाई असे सहा जण पॉझिटिव्ह निघाले. याखेरीज कृषिसेवा केंद्र साठा रजिस्टरवर स्वाक्षरी घेण्यास आलेल्या तीन कृषी सेवा केंद्र चालकांनाही कासार यांनी कोविड टेस्ट करून येण्यास सांगितले. त्यातील एक कृषी सेवा केंद्र चालक पॉझिटिव्ह निघाला.

या कार्यालयात गेल्या वर्षभरापासून येणाऱ्या प्रत्येकाची ऑक्सिजन पातळी तपासली जाते. इतरही उपाययोजना करण्यात आल्या. कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांनी, तसेच महाडीबीटी आणि पोखरा योजनेची कामे करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन श्री. कासार यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...