agriculture news in marathi corona positive patient decreases eleven thousand patient recovered in a day | Agrowon

सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका दिवसांत विक्रमी कोरोनामुक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 31 मे 2020

कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झाले

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईतील आजचा दिवस भारतासाठी नवा आशेचा किरण घेऊन आला. मागच्या २४ तासांत ११ हजारांहून जास्त विक्रमी रूग्ण कोरोनामुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सक्रिय रूग्णांची संख्या या संपूर्ण काळात प्रथमच घटली. रूग्ण बरे होण्याचाही दर (रिकव्हरी रेट) आतापर्यंत सर्वाधिक ४७ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला.

या जागतिक महामारीचा भारतातील वाढता प्रकोप चालूच असून गेल्या २४ तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक ७,९६४ नवे रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण रूग्णसंख्या पावणे दोन लाखांवर पोहोचली. कोरोना रूग्णसंख्येबाबत भारत तुर्कस्तानला मागे टाकून नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

देशात गेल्या २४ तासांत आणखी २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींचा हा आकडाही आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. एकूण मृतांची संख्या पाच हजारापर्यंत पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली व मध्य प्रदेश ही राज्ये मतांच्या संख्येबाबत चिंताजनक कल दाखवीत आहेत..त्याचवेळी याच कालावधीत काही सक्रिय घटनांचा सांगावाही आरोग्य मंत्रालयाकडून आल्या आहे.

मागच्या २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या ११,२६४ होती तर नवे ७,९६४ रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारांची संख्या जास्त असण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आज ८६,४२२ होती. ती कालच्यापेक्षाही कमी असल्याचीही पहिलीच वेळ होती. काल (२९ मे) सक्रिय रूग्णसंख्या ८९,९८७ होती. आतापावेतो सक्रिय रूग्णसंख्या, बरे होणारे रूग्ण यांचे प्रमाण व्यस्त दिसत होते. त्यात प्रथमच मोठा बदल आढळून आला आहे. बरे झालेली एकूण रूग्णसंख्या ८२,३७० वर तर रिकव्हरी दर ४७.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्थात, केंद्राच्या तक्रारीप्रमाणे पश्चिम बंगालसारखी काही राज्ये केंद्राकडे वेळेवर व खरी रूग्णसंख्या माहिती पाठवत नाहीत. 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...