agriculture news in Marathi corona security committee for stop people Maharashtra | Agrowon

बाहेरगावाहून गावात व्यक्तींना रोखण्यासाठी कोरोना ग्रामसुरक्षा समिती 

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

बाहेरगावाहून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होण्याच्या दृष्टीने ग्रामपातळीवर ‘कोरोना ग्रामसुरक्षा समिती’ स्‍थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

नगर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंधात्‍मक उपयायोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून बाहेरगावाहून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होण्याच्या दृष्टीने ग्रामपातळीवर ‘कोरोना ग्रामसुरक्षा समिती’ स्‍थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत आदेश दिले. गावचे सरपंच हे या समितीचे अध्यक्ष तर पोलिस पाटील हे सदस्य सचिव असणार आहेत. याशिवाय तलाठी आणि ग्रामसेवक हे यात सदस्य राहणार आहेत. 

राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ऊसतोड कामगार, परराज्‍यातील/पुणे, मुंबई व इतर जिल्‍ह्यातून आलेले, विद्यार्थी, भाविक, पर्यटक आदी बाहेरुन ग्रामीण भागामध्‍ये व्यक्ती आली असल्याचे निदर्शनात आल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दुष्‍टीने बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींपासून संभाव्‍य धोका टाळण्‍यासाठी गावपातळीवर निर्देश देणे आवश्यक आहे. त्यामुळे ही समिती स्थापन करण्यात आली आहे. 

बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास येणाऱ्या व्‍यक्‍तींना परवानगी नसल्‍यास गावात प्रवेश देऊ नये. तथापी परवानी असल्‍यास तहसीलदार तथा घटना व्‍यवस्‍थापक यांच्या निदर्शनास आणून दिल्‍यानंतरच गावात प्रवेश द्यावा. बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींचे नाव व इतर सविस्‍तर तपशिल यांची नोंद सदस्‍य सचिव यांनी ठेवायची आहे. ज्‍या गावामध्‍ये पोलीस पाटील नाहीत त्‍या ठिकाणी ग्रामसेवक सदस्‍य सचिव म्‍हणून कामकाज पाहतील. बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी संस्‍थात्‍मक विलगीकरणासाठी जिल्‍हा परिषद शाळा, अंगणवाडी भवन आदी सुनिश्चित करुन ठेवावी व सदर व्‍यक्‍तींची व इमारतीची देखभाल व सुरक्षा संबंधीत ग्रामपंचायतीने करावी. 

बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींची आरोग्‍य विभागामार्फत तात्‍काळ तपासणी करावी. बाहेरुन गावात वास्‍तव्‍यास आलेल्‍या व्‍यक्‍तींचे पुढील १४ दिवसांसाठी संस्‍थात्‍मक विलगीकरण बंधनकारक राहील व तसे संबंधीतांच्‍या हातावर शिक्‍के मारण्‍यात यावे. तसे न केल्‍यास याची गांभिर्याने दखल घेण्‍यात येईल. सारी आणि कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळून आल्‍यास अशा व्‍यक्‍तींची माहिती तात्‍काळ तालुका कोव्‍हीड केअर सेंटर यांना कळविण्‍यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व जबाबदारी समितीवर देण्यात आली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...