कोरोना संशयीत रुग्णांची ग्रामीण भागातच व्यवस्था

येत्या दोन दिवसात जिल्ह्यात दहा ठिकाणी जिल्हा परिषदेची कोव्हिड केअर सेंटर सुरू होतील. त्यानंतर आठवडाभरात आणखी सहा ठिकाणी ही सेंटर सुरू करण्यात येतील. विलीणीकरण कक्षासह, कोरोनासंदर्भातील सर्व तपासण्या आणि सुविधा या केंद्रांमध्ये उपलब्ध असतील. केंद्रात घशातील स्रावाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. - डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
corona
corona

पुणे : कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना आता थेट पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल केले जाणार नाही. त्याऐवजी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात १६ कोविंड केअर सेंटर सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एक प्रकारची ही कोविड हॉस्पिटल्स असतील. कोरोनाची लागण झाली असेल तरच रुग्णाला पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल अन्यथा सर्व उपचार देखील या केअर सेंटरमध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

कोरोना रुग्णाचे तपासणी, उपचार तसेच अन्य प्रकारच्या तपासण्या या पुण्यातील निवडक हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. या ठिकाणी सर्व प्रकारचे रुग्ण एकत्रित येत असल्याने अनेकदा एकमेकांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ग्रामीण भागातील ग्रीन झोन मधील रुग्ण अनेकदा रेड झोन मधील रुग्णांबरोबर तपासण्या आणि उपचार घेतात. त्यातून देखील संसर्ग वाढू शकतो म्हणून जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात स्वतंत्रपणे १६ ठिकाणी कोविड केअर सेंटर्स कार्यरत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेने नुकतेच १८८ समुदाय आरोग्य अधिकारी यांची भरती केलेली आहे. त्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे ही कोव्हिड केअर सेंटर २४ तास सुरू असतील. 

या केअर सेंटरमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांचा संसर्ग काही कमी प्रमाणात होईल, तसेच त्यांना पुणे शहरातील हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी या केअर सेंटरमध्येच सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कोरोना तापसणी अहवाल येईपर्यंत या रुग्णांची जेवण आणि राहण्याची व्यवस्था याच सेंटरमध्ये केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी केअर सेंटरची ठिकाणे निश्चित केली. खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे आणि यवत येथील जागांची प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली आहे. आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी केअर सेंटरची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com