agriculture news in Marathi corona test in veterinary college Maharashtra | Agrowon

पशुवैद्यकीय महाविद्यालयात आता कोरोना चाचणी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

पशुवैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद् घाटन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.

नागपूर ः पशुवैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद् घाटन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार डॉ. विकास महात्मे यांची यावेळी उपस्थिती होती. 

पशुवैद्यकीय महाविद्यालयातील या प्रयोगशाळेत पशूंपासून मानवांना होणाऱ्या विविध आजारांचे निदान केले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेने दिलेले सेंटर फॉर झोनोसिस कार्यरत आहे. या सेंटरमध्ये लेप्टोपॉरोसिस, टी.बी., स्क्रॅब टॉयफस व क्‍यू फिवर या महत्त्वाच्या आजारांवर संशोधन व निदान केले जाते. ही प्रयोगशाळा अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्यात उच्च तंत्रज्ञानाचा रोगनिदानासाठी वापर केला जातो. 

सहा प्राध्यापकांचे पथक येथे कार्यरत आहे. रिअल टाईम पीसीआर चाचणीव्दारे कोविड नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक जाणिवेतून विद्यापीठाने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे, अशी माहिती कुलगूरू डॉ. आशिष पातूरकर यांनी दिली. 

कुलसचिव चंद्रभान पराते, अधिष्ठाता डॉ. ए.पी. सोमकुंवर, संशोधन संचालक डॉ. एन. बी. कुरकुरे, प्रयोगशाळेचे डॉ. संदीप चौधरी, डॉ. वकार खान, डॉ. प्रभाकर टेभूणे, डॉ. शिल्पा शिंदे, डॉ. अर्चना पाटील यांनी चाचण्या करण्यासाठी आवश्‍यक ते प्रशिक्षण घेतले आहे. सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारीही या कामात मदत करणार आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...