नाशिकमधील कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित 

नाशिक : जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्व. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेली स्वॅब तपासणी प्रयोगशाळा मंगळवारी (ता. २८) कार्यान्वित झाली. येथे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीला सुरुवात झाली आहे. कोरोनाची प्राथमिक तपासणी या प्रयोगशाळेच्या माध्यमातून होणार असून त्यामुळे रुग्णांचे निदान तात्काळ होवून पुढील निर्णय घेणे सहज शक्य होणार आहे.
Corona testing laboratory in operation in Nashik
Corona testing laboratory in operation in Nashik

नाशिक : जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्व. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेली स्वॅब तपासणी प्रयोगशाळा मंगळवारी (ता. २८) कार्यान्वित झाली. येथे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीला सुरुवात झाली आहे. कोरोनाची प्राथमिक तपासणी या प्रयोगशाळेच्या माध्यमातून होणार असून त्यामुळे रुग्णांचे निदान तात्काळ होवून पुढील निर्णय घेणे सहज शक्य होणार आहे. 

या तपासणी प्रयोगशाळेची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, ‘मविप्र’च्या सरचिटणीस निलीमाताई पवार, शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, डॉ. दादासाहेब दातार, स्नेहा दातार, डॉ. प्रशांत गांगुर्डे उपस्थित होते. 

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, प्रयोगशाळा तयार करण्यासाठी ‘मविप्र’ व दातार लॅब यांच्याकडील साधने व तंत्रज्ञान यांचे एकत्रिकरण करून सुसज्ज अशी प्रयोगशाळा तयार करण्यात आली असून जिल्ह्यासाठी खरच एक दिलासादायक बाब आहे. पुण्याला स्वॅब रिपोर्ट पाठविण्याची जी आरोग्य यंत्रणेची धावपळ होत असे ती आता थांबणार आहे. तातडीने तपासणी अहवाल आल्याने रुग्णांचे क्वारंटाइन व्यवस्थापनेचे काम सुद्धा सोपे होणार आहे. लॅब सुरू करण्याचे यश प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या पाठपुराव्यामुळे आल्याचे त्यांनी सांगितले. 

येत्या काळात कोरोनाचा सामना सक्षमपणे करण्यास या लॅबचा मोठा वाटा असणार आहे. तसेच लॅबच्या रुपाने जिल्ह्याला महत्त्वाचे आयुध मिळाले असल्याचे श्री. मांढरे यांनी सांगितले. तपासणी प्रयोगशाळेत मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे डॉ. निता गांगुर्डे, डॉ. रुपाली गांगुर्डे, डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. रुपाली पवार, डॉ. सुनिता फटाले ही टीम काम पाहणार आहे. तसेच तांत्रिक काम मिना रत्ने, वीणा सोनवणे, तुषार वांरुगसे, सोपान पिंगळे, कावेरी वाघ, संपतराज, श्रीनिवास फडके हे पाहणार आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला होणार फायदा  या प्रयोगशाळेच्या माध्यमातून दिवसाला १८० नमुने तपासणी होणार असून दुसरे यंत्रही लवकरच कार्यरत झाल्यावर त्याची क्षमता ३६० पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी होणार असल्याने या लॅबचा फायदा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला होणार असल्याचे मत पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com