Agriculture news in marathi For corona treatment in the state ३० Special Hospitals Announced : Tope | Agrowon

राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित ः टोपे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

मुंबई : ‘‘‘कोरोना’ला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील.

मुंबई : ‘‘‘कोरोना’ला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. २३०५ खाटा ‘कोरोना’बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत’’, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता.२) दिली. 

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि ‘कोरोना’चे निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असेल. राज्य शासनातर्फे कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यावरील उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली आहेत. त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. एकूण २३०५ खाटा कोरोना बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. 

जिल्हा आणि त्यातील अधिसूचित रुग्णालयांची नावे (कंसात खाटांची संख्या) 

ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी. बी बिल्डिंग (१००), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण डोबिवली महापालिका- शास्त्री नगर दवाखाना (१००), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००), नाशिक- कुंभमेळा बिल्डिंग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (१००) (७०), नगर- जिल्हा रुग्णालय (१००), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालयाची शहारातील इमारत (५०), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), सातारा- सामान्य रुग्णालय (६०), सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी-सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०). 

मराठवाड्यातील रूग्णालये 

औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०). 

विदर्भातील रूग्णालये 

अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (१००), वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (१००), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (८०) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००) 
 


इतर ताज्या घडामोडी
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...