agriculture news in marathi corona Vaccination will start from 16th January 2021 | Agrowon

ठरलं तर.. १६ जानेवारीपासून लसीकरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 जानेवारी 2021

देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून सर्वात आधी ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांना ही लस मोफत लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २७ कोटी नागरिकांना ही लस दिली जाईल.

नवी दिल्ली : देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार असून सर्वात आधी ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांना ही लस मोफत लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २७ कोटी नागरिकांना ही लस दिली जाईल. या लस वितरणाच्या तयारीसाठी पंतप्रधान मोदी सोमवारी (ता. ११) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. 

कोरोना लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीस मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव यांच्यासह वेगवेगळ्या विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. संक्रांती आणि तत्सम सणांच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीला देशभरात लसीकरण मोहिमेस सुरवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत १६ जानेवारीला महत्त्वाची वाटचाल करेल. यात धैर्यवान डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यासह फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

ॲपवर नोंदणी 
लसीकरणासाठीच्या को-विन अॅपवर आतापर्यंत ७९ लाख संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या अॅपवर लस, वितरण, पुरवठा, लस साठविण्याचे निकष, तापमान याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध असेल. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पडताळणी आणि लसीकरणानंतर लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था असेल. 

केजरीवालांची मागणी 
डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्ध्यांप्रमाणेच इतरांना ही लस मोफत मिळेल की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील सर्व नागरिकांना मोफत लस मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली. कोरोना ही आतापर्यंतची सर्वात मोठी आपत्ती असून त्यापासून लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोरोना लस सर्व देशवासीयांना मोफत दिली जावी. यावरील खर्च भारतीय नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

कोव्हॅक्सिनचा साठा राखीव 
केंद्र सरकारने याआधीच कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. यातील सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड ही लस या मोहिमेदरम्यान देण्यात येईल. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस राखीव साठा म्हणून ठेवली जाणार असून कोरोनाचा उपद्रव वाढल्यानंतर या लशीचा वापर केला जाईल. त्या पार्श्वभूमीवर कोव्हिशिल्ड लस येत्या ७२ तासांत देशांतील प्रमुख शहरांमध्ये पोचविण्याचे नियोजन सरकारने आखले आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...