कोंबडी ३० रुपये किलो, तर चिकन १५० !

कोंबडी ३० रुपये किलो, तर चिकन १५० !
कोंबडी ३० रुपये किलो, तर चिकन १५० !

पुणे : राज्यात ब्रॉयलर कोंबड्यांचा फार्म लिफ्टिंग रेट ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत घटला आहे. त्यानुसार रिटेल चिकनचे विक्री रेट कमाल ७० रुपये असावेत; प्रत्यक्षात पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील किरकोळ विक्री दुकानात १५० रुपये प्रतिकिलोने चिकन विक्री होत आहे. काही समाजकंटक प्रवृत्तींनी फेसबुक, व्हॉट्सॲपवर ''कोंबड्यामध्ये कोरोना विषाणू'' अशी खोट्या पोस्ट्स पसरवल्यानंतर ब्रॉयलर कोंबड्यांच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. मागील दहा दिवसांत ७५ रुपये प्रतिकिलो फार्म लिफ्टिंग दर आता ३० रुपयांच्या नीचांकापर्यंत पोचला आहे.  अलिबागस्थित कुकुचकू पोल्ट्री फार्मचे संचालक कुणाल पाथरे म्हणाले,  "कोंबड्यांचा प्रतिकिलो उत्पादन खर्च ७५ ते ७८ रुपये आहे. मागील दहा महिन्यांपासून कच्चा माल महागल्याने उत्पादन खर्च वाढलाय. त्या तुलनेत सरासरी लिफ्टिंग रेट ७२ ते ७५ रुपये दरम्यान आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष तोट्यात असतानाच दुष्प्रचारामुळे आता मोठाच आघात बसला आहे. यातून पोल्ट्री उद्योग नक्की सावरेल, पण दीर्घकाळपर्यंत याची आर्थिक झळ बसत राहील." “व्हॉट्सअप, फेसबुकवर ब्रॉयलर पक्ष्यांचे शवविच्छेदनाचे फोटो प्रसारित केले जात आहेत. खरे तर ते राणीखेत या रोगाने प्रादुर्भाव झाल्याचे फोटो आहेत. भारतामध्ये मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहेत. चिकन व मटण उकळवून शिजवून घेतले जातात. पाणी हे १०० डिग्री तापमानाशिवाय उकळले जात नाही. अशा तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण २७ ते ४५ डिग्री पेक्षा अधिक तापमानात जगत नाहीत. भारतात मांसाहारी पदार्थ शिजवताना आले, हळद आदी औषधी गुणधर्माचे मसाले वापरले जातात. त्यामुळे आजपर्यंत भारतात चिकन-मटणातून विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याची नोंद नाही.” चिकनचे रिटेल बोर्ड रेट हे लिफ्टिंग रेटनुसार बदलले पाहिजेत. जेणेकरून ग्राहकांना कमी पैशात जास्त चिकन मिळते. यामुळे कोंबड्यांचा खप वाढून मंदीची तीव्रता कमी होते. शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे हित साधले जाते. म्हणून, रिटेल चिकन विक्रेत्यांनी बोर्ड रेट कमी करावेत, असे आवाहन पोल्ट्री ब्रीडर्स अॅन्ड वेल्फेअर असोसिएशनने (पीएफबीए) केले आहे. खोट्या पोस्ट्स पसरवून पोल्ट्रीसह शेती-उद्योगाच्या नुकसान करणाऱ्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी. पोल्ट्री उद्योगावर मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकरीही अवलंबून असल्याने सरकारने या प्रश्नाची व्याप्ती लक्षात घ्यावी. - डॉ. अजित नवले, सचिव, अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com