नाशिकमध्ये लोकसहभागातून 'कोरोनामुक्त गाव अभियान'

नाशिक : ‘‘कोरोनाचाग्रामीण भागात वाढलेलाप्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदतर्फे‘कोरोना मुक्त गाव अभियान' राबविण्यात येतआहे.
 'Coronamukta Gaon Abhiyan' in Nashik through public participation
'Coronamukta Gaon Abhiyan' in Nashik through public participation

नाशिक : ‘‘कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा परिषदतर्फे  ‘कोरोना मुक्त गाव अभियान' राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व ग्रामपंचायतीची जबाबदारी  वाढवून सरपंच,  सदस्य,  ग्रामसेवक,  पोलिस पाटील व तलाठ्यांद्वारे गाव  ‘कोरोनामुक्त’  करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. 

बनसोड यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गटविकास अधिकाऱ्यांसह जवळपास १४०० ग्रामपंचायती, सरपंच,  ग्रामसेवक,  सदस्य यांच्याशी नुकताच संवाद साधला. ग्रामीण भागात क्षेत्रीय पातळीवर कामाच्या सूचना देण्यात आल्या.  कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्राची आखणी, प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांची देखरेख याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. 

गेल्या दीड महिन्यांपासून यावर काम सुरू होते. लोकसहभाग वाढवून ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गावातच लक्ष देऊन नियोजन केल्याने गाव कोरोनामुक्त  करण्यासाठी प्रयत्न यशस्वी होत आहे. काही गावांमध्ये १०० च्या वर रुग्ण होते. वेळीच केलेल्या नियोजनामुळे ही संख्या १० च्या खाली आली आहे. 

ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात खाटा पूर्ण क्षमतेने भरल्याने दबाव वाढता आहे. अनेक लोक गृह विलगीकरणात न थांबता बाहेर फिरत आहेत. अशा लोकांना गावात संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. या माध्यमातून ग्रामीण आरोग्य केंद्राशी संबंधित कर्मचारी योग्य काळजी घेऊन घरोघरी न जाता एका जागेवर सेवा देणे शक्य होत आहे.

एकत्रितपणे नियोजन करून संबंधितांची योग्य उपचार, घरगुती आहार याबबत नियोजन  केले जात आहे. त्यामुळे किमान १० दिवस रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात थांबून कोरोनामुक्त होऊन घरी जाणार  असल्याचा विश्वास बनसोड यांनी व्यक्त केला. 

कामकाज असे

  •  हॉटस्पॉट ठरलेल्या गावांवर विशेष लक्ष 
  •  ४५ वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणावर भर 
  •  रूग्णांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था 
  •  रुग्ण आढळल्यास कंटेनमेंट झोन करण्याची काटेकोर अमंलबजावणी
  • ज्याप्रमाणे 'हागणदारीमुक्त गाव', 'तंटामुक्त गाव' संकल्पना आहे. त्यामध्ये लोकसहभाग महत्वाचा असतो. त्याच धर्तीवर ही संकल्पना आहे. कोरोनामुक्त गाव हे अभियान हाती घेतले आहे. अनेक  भागात ते सुरू झाले आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यास मोठा हातभार लागत आहे.  - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com