कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
कोरोनाची स्थिती गंभीर; सरकारला सहकार्य करा ः शरद पवार
जनतेच्या जीवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्य सरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे कळकळीचे आवाहन शरद पवार यांनी केले.
मुंबई ः कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने आणि सामूहिकपणे आपण सामोरे गेलेच पाहिजे. आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे, की आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीवितासाठी, सुरक्षिततेसाठी राज्य सरकारला अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे कळकळीचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेला आज केले.
या वेळी शरद पवार यांनी गेल्या वर्षी आणि या वर्षीची कोरोनाची सद्यःस्थितीतील आकडेवारी मांडली. एवढी गंभीर व भयावह स्थिती यापूर्वी देशातील कुठल्याही राज्यात अशी कधी नव्हती. सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय ही चिंताजनक बाब आहे, असेही शरद पवार या वेळी म्हणाले.
राज्यातील आरोग्य यंत्रणेचे सगळे घटक त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे अहोरात्र कष्ट करत आहेत. अहोरात्र कष्ट करून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. रुग्णांसाठी बेड्स, वैद्यकीय उपकरणे आणि इतर पायाभूत सुविधा यांचादेखील प्रचंड ताण आलेला आहे. त्यामुळे नाइलाजाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. आता पर्याय राहिलेला नाही, असेही पवार यांनी सांगितले.
- 1 of 1098
- ››