नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या बाजारावर कोरोनाची छाया

नाशिक : शेतकाऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. कोरोनाची त्यात भर पडली. त्यामुळे बैल पोळ्याचा बाजार ओस पडल्याचे चित्र आहे. यंदा बैलपोळा सणावर कोरोनाची छाया आहे.
 Corona's shadow on the `bailpola` market in Nashik city
Corona's shadow on the `bailpola` market in Nashik city

नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व नसलेले दर, यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्याचाच शेतकाऱ्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. कोरोनाची त्यात भर पडली. त्यामुळे बैल पोळ्याचा बाजार ओस पडल्याचे चित्र आहे. यंदा बैलपोळा सणावर कोरोनाची छाया आहे. 

दरवर्षी पोळ्याला बैलांना सजविण्यासाठी गळ्यातील घुंगरमाळ, कपाळाचे बाशिंग, बेगडं, शिंगाचे गोंडे, रंगीत पट्ट्या, नवीन कासरे, दावे अशा साहित्याने बाजारपेठ भरलेली असते. बैलांना सजविण्याची तयारी पोळ्याच्या आठ दिवस आधी सुरू होते. यामुळे शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग वाढत असते. मात्र, यावर्षी हा बाजार सजला नसल्याची स्थिती आहे. 

नाशिक शहरात पंचवटी परिसरात निमानी, पेठ नाका, बाजार समिती व्यापारी संकुल परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटलेली असतात. मात्र, यावर्षी ती अजूनही फुललेली नाहीत. शेतकऱ्यांची गर्दी नसल्याने हे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाच्या भितीपोटी दुकाने कमी आहेत. तर, दुसरीकडे ग्राहकांची संख्याही कमीच आहे. 

कोरोनाची भीती आहे. पण, बैलपोळा सण बरा होईल, या विचार करून पोळा साहित्य खरेदी करून विक्रीस आणले आहे. मात्र, त्याला चालू वर्षी गिऱ्हाईक नसल्याने अडचण आहे. आतापर्यंत असे संकट कधी नव्हते

.- हिराबाई बल्हे, विक्रेत्या, नाशिक.

सगळी यंत्रे असली तरी घरी जनावरे आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीप्रमाणे दरवर्षी सण साजरा करतो. त्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन साहित्य खरेदीसाठी आलो आहे.  - शिवाजी पिंगळे, शेतकरी, मातोरी, ता. नाशिक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com