Agriculture news in marathi Corona's status soon Will come under control: Jayant Patil | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात `कोरोना’ची स्थिती नियंत्रणात येईल ः जयंत पाटील

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

सोलापूर :‘‘शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर असली, तरी नियंत्रणात आहे आणि पुढील पंधरा दिवसांत ही परिस्थिती आणखी नियंत्रणात असेल. त्यावेळी चित्र काहीसे वेगळे दिसेल, काळजी करु नका’’, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले. 

सोलापूर :‘‘शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर असली, तरी नियंत्रणात आहे आणि पुढील पंधरा दिवसांत ही परिस्थिती आणखी नियंत्रणात असेल. त्यावेळी चित्र काहीसे वेगळे दिसेल, काळजी करु नका’’, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले. 

मंत्री पाटील हे रविवारी (ता.३) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आपण सोलापुरात कोरोनाच्या आढाव्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री दत्ता भरणे उपस्थित होते. दुपारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह सर्व वरिष्ठांची बैठक घेऊन कोरोनाची माहिती पाटील यांनी घेतली. तसेच काही सूचना केल्या. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलले. 

पाटील म्हणाले, ‘‘सध्याचे जिल्ह्यातील सर्व अधिकारी चांगले काम करत आहेत. आरोग्य, महसूल वा पोलिस सर्वच यंत्रणा आपापल्या पद्धतीने जबाबदारीने काम करत आहेत. सोलापुरात रुग्ण वाढू नयेत, कोरोना चाचणीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्वॅबपूर्वी काही उपाययोजना करता येतील का, ज्या ठिकाणी कोरानाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करुन आणखी कठोर उपाययोजना केल्या जातील का, हे तपासून निर्णय घ्या, तशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 

सोलापुरात वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. नेमले तरी सध्याच्या अधिकाऱ्यांचेही काम चांगले आहे. पण, वरचे आणि खालचे अधिकारी असा विनाकारण वाद निर्माण करु नका, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...